हार्दिकला कोणत्या एका गोष्टीमुळे कर्णधारपद मिळाले, पाहा…हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरातच्या संघाने आयपीएलचे जेतेपद पटकावले. त्यानंतर भारतीय संघात हार्दिक दाखल झाला. पण जर आयपीएलमधील नेतृत्वाच्या जोरावर जर हार्दिकला संघात स्थान दिले असते तर त्याला उपकर्णधार तरी करण्यात आले असते. पण लोकेश राहुलला कर्णधार आणि रिषभ पंतला उपकर्णधार करण्यात आले. लोकेश राहुल दुखापतीमुळे या मालिकेत खेळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यावर हार्दिककडे भारतीय संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले असते. पण बीसीसीआयने तसे केले नाही. पण आता आयर्लंडच्या दौऱ्यासाठी मात्र हार्दिकची निवड करण्यात आली आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आयर्लंडचा दौरा सुरु असताना दुसरीकडे भारताचे अनुभवी खेळाडू हे इंग्लंड दौऱ्याच्या तयारीत मश्गुल असतील. त्यामुळे रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमरा आणि रिषभ पंत हे इंग्लंडच्या दौऱ्यावर असतील. त्याचबरोबर लोकेश राहुल जेव्हा दुखापतीमुळे संघाबाहेर गेला, तेव्हा उपकर्णधार पंत होता आणि त्याच्याकडे संघाचे नेतृत्व सोपववण्यात आले. त्याच धर्तीवर आता रिषभ पंत भारताचा ट्वेन्टी-२० मालिकेत कर्णधार आहे, तर हार्दिक हा उपकर्णधार आहे. पण पंत यावेळी इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे उपकर्णधार असल्यामुळे आता हार्दिकला संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. भारताच्या संघात दिनेश कार्तिक आणि भुवनेश्वर कुमारसारखे हार्दिकपेक्षा जास्त अनुभवी खेळाडू आहेत. पण हार्दिककडे संघाचे उपकर्णधारपद आहे आणि सध्याचा कर्णधार हा या दौऱ्यावर जात नसल्यामुळे त्याच्याकडे संघाची धुरा सोपवण्यात आली आहे.
भारताचा संघ : हार्दिक पंड्या (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, वेंकटेश अय्यर, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, हर्षल पटेल, अवेश खान, उमरान मलिक, अर्शदीप सिंग आणि रवी बिश्नोई.