गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप, शिवसेनेची युती होती. राज्यात भाजपनं २३ जागा जिंकल्या होत्या. तर शिवसेनेनं १८ जागांवर विजय मिळवला होता. २०२४ मध्ये राज्यात ४५ जागा जिंकण्याचं ध्येय भाजपनं ठेवलं आहे. शिवसेनेच्या अनेक जागांवर भाजपनं लक्ष केंद्रीत केलं आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने १६ मतदारसंघ निवडले आहेत. पैकी १० मतदारसंघ शिवसेनेचं प्राबल्य असलेले आहेत.
लोकसभा निवडणूक २०२४ साठीच्या तयारी आणि रणनिती ठरविण्यासाठी आज राज्य भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष विनोद तावडे उपस्थित होते. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने १६ मतदारसंघ निवडले आहेत, याव्यतिरिक्त ८ मतदारसंघावर देखील लक्ष ठेवणार असल्याचं फडणवीस म्हणाले. यावेळी बारामती, मावळ, सोलापूर, कोल्हापूर, सातारा मतदारसंघात जोर लावण्याच्या सूचनाही फडणवीसांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या.
कोणकोणत्या जागांवर भाजप लक्ष देणार?
बुलढाणा, चंद्रपूर, हिंगोली, औरंगाबाद, पालघर, कल्याण, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, रायगड, बारामती, शिरूर, शिर्डी, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी भाजपनं प्रभारी जाहीर केले आहेत. यातील १० मतदारसंघ शिवसेनेचे आहेत.
शिवसेनेचे कोणते मतदारसंघ भाजपच्या रडारवर? तिथे सध्या खासदार कोण?
बुलढाणा- प्रतापराज जाधव
हिंगोली- हेमंत पाटील
पालघर- राजेंद्र गावित
कल्याण- श्रीकांत शिंदे
दक्षिण मध्य मुंबई- शेवाळे
दक्षिण मुंबई- अरविंद सावंत
शिर्डी- सदाशिव लोखंडे
रत्नागिरी-सिंधुदुर्ग- विनायक राऊत
कोल्हापूर- संजय महाडिक
हातकणंगले- धैर्यशील माने
शिवसेनेचे बालेकिल्ले भेदण्याची जबाबदारी कोणावर?
बुलढाणा- अनिल बोंडे
हिंगोली- राणा जगजीतसिंग
पालघर- नरेंद्र पवार
कल्याण- संजय केळकर
दक्षिण मध्य मुंबई – प्रसाद लाड
दक्षिण मुंबई – संजय उपाध्याय
शिर्डी- राहुल आहेर
रत्नागिरी-सिंधुदुर्ग – आशिष शेलार
कोल्हापूर- सुरेश हळवणकर
हातकणंगले- गोपीचंद पडळकर