माझ्या नावाचा बोर्ड का काढला?…
हडपसर मुंढवा क्षेत्रीय कार्यालयामधील माझ्या नावाचा बोर्ड का काढला? याचा जाब विचारत मुंढव्याच्या राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका पूजा कोद्रे ह्या बुधवारी मीटिंगसाठी हडपसर क्षेत्रीय कार्यालयामध्ये आल्या होत्या. त्यांना प्रवेशद्वारावर त्यांचा असलेला नामफलक झाकून ठेवल्याचं दिसून आलं याचा राग त्यांना आल्यानंतर त्यांनी थेट दुसऱ्या मजल्यावर बसलेले उपअधीक्षक प्रदीप भुजबळ यांच्या टेबलाकडे जात माझा बोर्ड का काढला? असं विचारत गलिच्छ भाषेमध्ये शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी भुजबळ यांनी तात्काळ बोर्ड लावून त्यांना फोटो पाठवला. मात्र, त्या ऐकण्यास मनस्थितीत नव्हत्या.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सांगून तुझी नोकरी घालविते…
कोद्रे एवढ्यावरच थांबल्या नाहीत, त्यांनी चक्क ‘उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सांगून तुझी नोकरी घालविते, माझ्या नादी लागू नकोस, तुला माहित नाही मी किती मोठी गुंड आहे. तुला उभा कापून टाकीन, तु ऑफिसमध्ये कसा येतो मी हेच बघते, तुझं कंबरड मोडते, तुला घरात घुसून मारीन, मी आयुक्त काय नरेंद्र मोदीला पण घाबरत नाही, तुला कोणाकडे तक्रार करायची ती कर’. अशा अनेक प्रकारच्या धमक्या दिल्या व गलिच्छ शब्दांत वर्तन करत कार्यालयीन कामाकाजात अडथळा आणला. हा संपूर्ण प्रकार २० मिनिटे चालू होता. त्यामुळे कार्यालयीन कामकाज बऱ्याच वेळ ठप्प झाले होते.
व्हिडिओ शुटींग काढायची ती काढा मी कोणाला घाबरत नाही…
हा सर्व प्रकार कार्यालयीन कामकाजासाठी येणारे नागरिक पहात होते. तसेच कार्यालयातील उपस्थित सेवकांना उद्देशून म्हणाल्या की, ‘कोणाला व्हिडिओ शुटींग काढायची ती काढा मी कोणाला घाबरत नाही’. असं सागत पूजा कोद्रे यांनी उपाधिक्षक प्रदीप भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. याबाबतची तक्रार त्यांनी महापालिका आयुक्तांना आज केली असून कोद्रे यांच्यावर हडपसर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करणार असल्याचं कर्मचाऱ्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला सांगितलं आहे.
हडपसर मुंढवा साहाय्यक आयुक्त कार्यालयाचे साहाय्यक आयुक्त प्रसाद काटकर यांनी सांगितले की, बुधवारी दुपारी माजी नगरसेविका कार्यालयामध्ये आल्या आणि त्यांनी आमचे अधीक्षक भुजबळ यांना शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेवले असून, नगरसेविकेने गुंडागर्दी केल्याबाबतचे महापालिका आयुक्तांकडे पत्र दिलं आहे.
professional dating sites adult chat dating site singles sites adult singles dating site