सोलापूर : रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांचा ताफा सांगोल्यात एका व्यक्तीने अडवला असल्याचा प्रकार समोर आला आहे. एका हाॅटेल मालकाने सदाभाऊ खोत यांनी हाॅटेलमध्ये पार्टी करून त्याचे पैसे न दिले नसल्याच्या कारणावरून हा ताफा अडवला. हाॅटेल मालकाने खोत यांच्या गाड्यांच्या ताफ्यासमोर गोंधळ घातला. खोत यांच्या आज पंचायत राज समितीच्या दौऱ्यादरम्यान हा प्रकार समोर आला आहे.

२०१४ साली लोकसभा निवडणुकीमध्ये सांगोला तालुक्यातील मांजरी येथे एका हाॅटेलमध्ये राहिलेले ६६ हजार ४५० रुपये बिलाचे देण्याचे राहिले असल्यामुळे हाॅटेल मालकाने ताफा अडवला. दरम्यान, आपल्याला बदनाम करण्याचा राष्ट्रवादीचा डाव असल्याचा सदाभाऊ यांनी आरोप केला आहे. तर आपले पैसे द्या अशी हॉटेल मामा भाचाचे मालक अशोक शिनगारे यांनी आपली भूमिका यावेळी मांडली. वारंवार फोन करूनही सदाभाऊ पैसै देत नसल्याचा आरोप या हाॅटेल मालकाने केला आहे.

कर्जत जामखेडला रोहित पवार, तिकडचे राम शिंदे बारामतीत, फडणवीसांनी फासे टाकले
दरम्यान, हाॅटेल मालकाने केलेल्या आरोपांबाबत खोत यांनी प्रतिक्रिया देत आरोपांचं खंडन केलं आहे. ‘मी त्या मालकाला ओळखत नाही. हा माणूस राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. ते काळे झेंडे आणि निदर्शन करणार होते पण माझा ताफा लवकर आला आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. मी २०१४ पासून १५ वेळा सांगोल्यात आलो आहे. मी त्या माणसाला ओळखत नाही. राष्ट्रवादीकडून बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्टीकरण सदाभाऊ खोत यांनी यावेळी दिलं आहे.

‘अजितदादांना सांगून तुझी नोकरी घालवते’, राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविकेची दमदाटी
‘सांगोला तालुक्यात आल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक गोंधळ घालण्याचा प्रयत्न आणि अंगावरती येण्याचा प्रयत्न केला आहे. पोलीस स्टेशनमध्ये यासंदर्भात तक्रार करण्यात आली असून एका आरोपील ताब्यात देखील घेण्यात आलं आहे. परंतू अशा पद्धतीने माझा आवाज हा राष्ट्रवादीला दाबता येणार नाही’, असंही खोतांनी यावेळी सांगितलं.

iPhone 14 च्या लाँचआधी iPhone 13 च्या किंमतीत मोठी कपात, खूपच स्वस्तात खरेदीची संधी; पाहा डिटेल्स

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here