देहूतील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांना बोलू देण्यात आलं. याचा निषेध करण्यासाठी जळगावात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकत्र जमले. मात्र त्यांनी आणलेल्या बॅनरवर एक मोठी चूक होती. पत्रकारांनी ती चूक त्यांच्या लक्षात आणून दिली.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची गलती से मिस्टेक
हायलाइट्स:
- अजित पवारांसाठी राष्ट्रवादीचं आंदोलन
- महिला आघाडीच्या आंदोलनात मोठी चूक
- देहूच्या जागी बॅनरवर जुहू असा उल्लेख
अजित पवार यांना भाषण करू न दिल्यानं जळगावात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. कार्यकर्ते फलक घेऊन आंदोलनासाठी आले होते. आंदोलनकर्त्यांना गुंडाळलेला फलक सरळ केला आणि घोषणाबाजी सुरू केली. मात्र या फलकावर एक मोठी चूक होती. ‘अजितदादा पवारसाहेब यांना जुहू (मुंबई) येथे भाषण न करू दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी जळगाव शहर यांच्या तर्फे जाहिर निषेध’, असा मजकूर फलकावर होता.
अजित पवारांना देहूमध्ये बोलण्याची संधी दिली गेली नाही. मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आणलेल्या बॅनरवर देहूच्या जुहू असं लिहिण्यात आलं होतं. ही चूक तिथे उपस्थित असलेल्या पत्रकारांनी आंदोलकांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर या फलकाची चर्चा संपूर्ण शहरात झाली. आंदोलनस्थळी वापरायचे फलक आंदोलनापूर्वी पाहायचे असतात. मात्र राष्ट्रवादीच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांना याचा विसर पडला आणि त्यामुळे त्यांचं आंदोलन हसण्याचा विशेष ठरला.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : mistake on banner brought by ncp workers protesting for ajit pawar
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network