सांगली : इस्लामपूरच्या वाघवाडी येथील विवाहित महिलेच्या खुनाचा अखेर उलगडा झाला आहे. पतीकडूनच पत्नीची निर्घृण हत्या करण्यात आल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. सांगलीत विवाहितेचा विवस्त्र मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणी इस्लामपूर पोलिसांनी सुनील गुरव याला अटक केली आहे. चारित्र्याच्या संशयातून सुनील गुरव याने पत्नी प्रियांका गुरव हिचा खून केल्याचे उघडकीस आले आहे.

काय आहे प्रकरण?


इस्लामपूर नजीकच्या वाघवाडी येथील शिवपुरी रोडवरील बांदल मळा येथील एका शेतामध्ये बुधवारी प्रियांका सुनील गुरव या विवाहित महिलेचा मृतदेह विवस्त्र अवस्थेमध्ये आढळून आला होता. अत्यंत अमानुषपणे महिलेचा खून करण्यात आला होता. गळा आवळून नंतर मातीमध्ये डोके आपटून हत्या करत विवस्त्र अवस्थेत तिचा मृतदेह टाकून दिल्याचं समोर आले होतं.

सुरुवातीला सदर महिलेवर बलात्कार करुन हा खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता, तसेच अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचा अंदाजही वर्तवण्यात येत होता.


हेही वाचा :
दारु पिऊन आईला का छळता? बाईकवर बसवून बापाला रानात नेलं, कोयत्याने १० वेळा वार

या प्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्यांमध्ये या गुन्ह्याची नोंद झाली होती. इस्लामपूर पोलिसांनी गतीने तपास करत अवघ्या 24 तासांमध्ये खुनाचा छडा लावत पतीकडून हा खून करण्यात आल्याचे समोर आणले आहे. या प्रकरणी प्रियांका गुरव हिचा पती सुनील गुरव याला अटक केली आहे.

चारित्र्याच्या संशयावरुन वाद

सुनील आणि प्रियांका गुरव दोघे पती- पत्नी असून वाळवा तालुक्यातील तुजारपूर या ठिकाणी ते राहतात .या दाम्पत्याला तीन व पाच वर्षांच्या दोन मुली आहेत. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यामध्ये चारित्र्याच्या संशयावरून वाद सुरू होता. हा वाद पोलिस ठाण्यापर्यंत देखील गेला होता.

हेही वाचा :
माहेरच्या उंबरठ्यावरच भावाने बहीण-मेहुण्याला संपवलं, लग्नानंतर पाचव्याच दिवशी खून

दरम्यान गेल्या 15 दिवसांपासून प्रियांका गुरव घरातून बाहेर होती. त्यामुळे सुनिल गुरव याचा संशय आणखी वाढला होता. तर इस्लामपूर बस स्थानकावर प्रियांका गुरव फिरत असल्याचे समजल्यानंतर सुनिल गुरव त्या ठिकाणी पोहोचला. त्याने पत्नी प्रियंकाला महत्वाचे बोलायचं असं सांगून आपल्या दुचाकीवर बसवून वाघवाडी येथील शेतामध्ये नेले. त्यानंतर बोलण्यामध्ये गुंतवून ठेवत पत्नी प्रियांकाचा हाताने गळा दाबला, त्यानंतर तिचा मृत्यू झाल्याची खात्री होत नसल्याने तिचं डोकं मातीमध्ये आपटत खून करुन तो पसार झाला होता. अखेर इस्लामपूर पोलिसांनी खुनाचा उलगडा करत संशयित सुनील गुरव याला तुजारपूर येथील घरातून अटक केली आहे.

हेही वाचा :
अज्ञात मृतदेह ना मोबाईल ना ओळखपत्र, दोन टोप्यांवरुन १२ तासांत आरोपीला पकडलं

the wife committed the murder of her husband

विम्याचे एक कोटी मिळविण्यासाठी चक्क पत्नीनेच करवून घेतला पतीचा खून

Loading

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here