मला हेलिकॉप्टर खरेदी करायचे आहे
‘साहेब मी अल्पभूधारक शेतकरी आहे. निसर्गाचा लहरीपणा व त्यात मिळत नसलेले भाव त्यामुळे माझी शेती नेहमी तोट्यात आहे. इतर व्यवसायात सुद्धा मोठ्या प्रमाणावर स्पर्धा निर्माण झाली आहे. त्यामुळे काय करावे हे कळत नाही. मात्र, हा असा व्यवसाय आहे की त्यामध्ये एका तासाला किमान ६५ हजार रूपये एवढे भाडे मिळत असते, त्यामुळे मला हेलिकॉप्टर खरेदी करायचे आहे’, असं त्याने म्हटलं आहे.
मला ६ ते ७ कोटी पाहिजे
‘माझ्याकडे असलेली दोन एकर शेती विकूनही कर्जाची परतफेड होत नाही. त्यामुळे साहेब मला हेलिकॉप्टर खरेदीसाठी कर्ज देण्यात यावे. हेलिकॉप्टर खरेदीसाठी जवळपास ६ ते ७ कोटी रुपयांच्या वर खर्च येतो. असं अल्पभूधारक शेतकरी कैलास पतंगे याने बँक अधिकाऱ्यांना आपल्या दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. या शेतकऱ्यांच्या अजब मागणीमुळे जिल्ह्यात हा चर्रेचा विषय ठरत आहे’.