Vasant More son threatened letter | राजकारणात काम करत असताना अनेकदा कळत नकळत कधी कोण शत्रू होतो तेच समजत नाही…तसा रुपेश कोणाच्या अध्यातमध्यात नसतो तरीही असे का ? हाच प्रश्न मनाला चटका लावून जातोय. आपण रात्रंदिवस जनतेचा विचार करायचा त्यांची कामं करायची आणि कोणी तरी आपल्या कुटुंबाबाबतीत असा विचार करायचा ? हे का तेच कळत नाही.” असं देखील वसंत मोरे म्हणाले आहेत.

 

Vasant More (1)
<p>वसंत मोरे, मनसे</p>

हायलाइट्स:

  • वसंत मोरे हे पुण्यातील मनसेचे कायम चर्चेत राहणारे नेते आहेत
  • आपल्या खळ्ळ-खट्याक स्वभावामुळे ते नेहमीच चर्चेत असतात
  • धमकीच्या पत्रानंतर वसंत मोरेंकडून पोलिसांत तक्रार
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश मोरे याला धमकी मिळाल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर वसंत मोरेंनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.नुकताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray0 यांच्या वाढदिवसानिमित्त वसंत मोरे (Vasant More) यांनी भव्य रोजगार मेळावा घेतला होता. या मेळाव्याचे सर्व नियोजन हे मोरेंचा मुलगा रुपेश मोरे (Rupesh More) यांच्याकडे होते. या कार्यक्रमादरम्यान एका शाळेच्या आवारात रुपेश मोरे यांची चारचाकी गाडी लावण्यात आली होती. याच ठिकाणी गाडीच्या वायपरमध्ये ‘सावध राहा रुपेश’ अशी चिट्ठी ठेवण्यात आली आली होती. याबाबत आता भारती विद्यापीठ पोलीस पुढील तपास करत आहेत.

वसंत मोरे हे पुण्यातील मनसेचे कायम चर्चेत राहणारे नेते आहेत. आपल्या खळ्ळ-खट्याक स्वभावामुळे ते नेहमीच चर्चेत असतात. नुकतेच मशिदीसमोर हनुमान चालीसा लावण्याच्या राज ठाकरेंच्या आदेशाला विरोध केल्याने वसंत मोरे राज्यभर चर्चेचा विषय ठरले होते. या धमकीच्या पत्रानंतर वसंत मोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मुलगा म्हटले की प्रत्येक बापाचा अभिमान असतो आणि बाप म्हटले की प्रत्येक पोराचा आयडॉल असतो. आमचेही अगदी तसंच आहे, पण कोणाला तरी हे का खटकतंय तेच समजत नाही.” असं म्हटलंय
वसंत मोरे दिराच्या भूमिकेत, बसमध्ये वाट पाहणाऱ्या लेकुरवाळ्या महिलेला घरी सोडलं
तर, “राजकारणात काम करत असताना अनेकदा कळत नकळत कधी कोण शत्रू होतो तेच समजत नाही…तसा रुपेश कोणाच्या अध्यातमध्यात नसतो तरीही असे का ? हाच प्रश्न मनाला चटका लावून जातोय. आपण रात्रंदिवस जनतेचा विचार करायचा त्यांची कामं करायची आणि कोणी तरी आपल्या कुटुंबाबाबतीत असा विचार करायचा ? हे का तेच कळत नाही.” असं देखील वसंत मोरे म्हणाले आहेत. दरम्यान, “तू जो कोणी असशील तो पुसट असा कॅमेऱ्यात दिसतोय. बाबा फक्त इतकेच लक्षात ठेव त्याचा बाप वसंत ( तात्या ) मोरे आहे…!” असा इशारा वसंत मोरेंनी धमकी देणाऱ्याला दिला आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : mns leader vasant more son rupesh more get threatened letter
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here