प्रेमसंबंधांना नकार दिल्याने तरुणीच्या फोटोसह अश्लील मजकूर केला शेअर; विकृत तरुणाला अटक – the young man posted offensive texts with a photo of a 17-year-old girl for refusing a love affair.
रत्नागिरी : अल्पवयीन मुलीने प्रेमसंबंध ठेवण्यास तसंच लग्न करण्यास नकार दिल्याने सोशल मीडियावर या मुलीबाबत अश्लील मजकूर प्रसिद्ध करून बदनामी केल्याची घटना दापोली शहरात घडली आहे. दापोली पोलिसांनी याप्रकरणी संशयित आरोपीविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. सदर आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. बुधवारी रात्री उशिरा हा गुन्हा दाखल झाला असून गुरुवारी त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याप्रकरणी दापोली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २ जानेवारी ते १० एप्रिल २०२२ या कालावधीत संशयित अनिकेत रवींद्र ढेपे पाटील (वय २४) याने 17 वर्ष वय असलेल्या एका मुलीकडे प्रेमसंबंध ठेवण्यास तसेच लग्न करण्यासाठी तगादा लावला. मात्र मुलीने त्यास नकार दिल्याने अनिकेतने फेसबुकवर सदर मुलीचा फोटो टाकून अश्लील मजकूर पोस्ट केला. यामुळे बदनामी झालेल्या पीडित मुलीने अखेर दापोली पोलीस ठाण्यात संशयित अनिकेत ढेपे पाटील याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. Vasant More: वसंत मोरेंच्या मुलाला धमकी, पुण्यात एकच खळबळ
दापोली पोलीस ठाण्यात अनिकेतविरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियम, लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानुसार भादवी ३५४ ड , ५०९, ५०६, पोस्को कलम १२ तसेच आयटी अॅक्ट ६७ नुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक विवेक आहिरे हे करत आहेत.
केतकी चितळेला जामीन मंजूर, मात्र पुढचे पाच दिवस तुरुंगातच मुक्काम
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times