मुंबई महापालिकेच्या हद्दीत गुरुवारी २,३६६ नवे करोनाबाधित आढळले आहेत. यामुळे मुंबईतील आजपर्यंतची करोनाबाधितांची एकूण संख्या १० लाख ८७ हजार ३२६ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत दोन आणि रायगडमध्ये एक अशी एकूण तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे, असे आरोग्य विभागामार्फत सांगण्यात आले.
ठाण्यातील करोनाच्या आकड्यामध्ये चांगलीच वाढ झाली आहे. ठाणे जिल्ह्याचा करोनाचा आकडा हजारपर्यंत येऊन पोहचला आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने करोनाच्या रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. गुरुवारी ९३४ करोना बाधित रुग्णांची नोंद झाली तर महानगरपालिका हद्दीत एकूण ३५८ रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत ७ लाख १७ हजार ९० इतके करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ३ हजार ७५३ इतके रुग्ण सक्रीय आहेत. त्यामुळे आता ठाणेकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. पण यामुळे कोणीही घाबरून न जाता आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, मास्कचा वापर करावा आणि स्वच्छता राखावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
का वाढतोय करोना?
बीएमसी आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, रुग्णांची संख्या वाढत असली तरी गंभीर रुग्णांची संख्या तशी कमी आहे. अशात मुंबईत मान्सून दाखल झाला, त्यामुळे नागरिकांनी मोसमी आजारांपासून सावध राहण्याची गरज आहे. सध्या सर्दी, खोकला आणि तापाची साथ असल्यामुळे लोक वेगाने आजारी पडत आहेय. अशात निर्बंध उठवल्याने लोक मास्क न वापरताच रस्त्यांवर फिरताना दिसतात. त्यामुळे कडक लॉकडाऊन नको असेल तर नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे.
ठाणे जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या पुढील प्रमाणे…
ठाणे महानगर पालिका
करोना बाधित रुग्ण : ३५८
सक्रीय रुग्ण : १४१६
कल्याण डोंबिवली महानगर पालिका
करोना बाधित रुग्ण : ८२
सक्रीय रुग्ण : ३५५
नवी मुंबई महानगर पालिका
करोना बाधित रुग्ण : ३६१
सक्रीय रुग्ण : १३७०
उल्हासनगर महानगर पालिका
करोना बाधित रुग्ण : २
सक्रीय रुग्ण : ५१
भिवंडी निजामपुरा महानगर पालिका
करोना बाधित रुग्ण : ३
सक्रीय रुग्ण : ११
Rainy Season Health Tips | पावसाळ्यातील साथीच्या रोगांवर घरीच करा ‘हे’ उपाय | Maharashtra Times
मीरा भाईंदर महानगर पालिका
करोना बाधित रुग्ण : ७४
सक्रीय रुग्ण : ३८१
अंबरनाथ नगरपरिषद
करोना बाधित रुग्ण : माहिती जमा नाही
सक्रीय रुग्ण : माहिती जमा नाही
कुळगाव बदलापूर नगरपरिषद
करोना बाधित रुग्ण : ११
सक्रीय रुग्ण : ३९
ठाणे ग्रामीण
करोना बाधित रुग्ण : ४३
सक्रीय रुग्ण : १३०
एकूण ठाणे जिल्ह्याचा करोना बाधित रुग्णांचा आकडा…
करोना बाधित रुग्ण :९३४
सक्रीय रुग्ण : ३७५३