श्रीवर्धन तालुक्यातील भोस्ते गावतील ही व्यक्ती असून ४ एप्रिल रोजी कुटुंबासह मुंबईतील वरळी येथून गावी आली होती. श्रीवर्धन येथील शासकीय रुग्णालयात येण्यापूर्वी सदर व्यक्तीने खासगी डॉक्टरांकडून उपचार घेतले होते. तथापि त्याची प्रकृती जास्त बिघडल्याने तो शासकीय रुग्णालयात ११ एप्रिल रोजी उपचारांसाठी आला. त्याच्याकडील खासगी रुग्णालयातील अहवाल व स्वॅब नमुने कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल आज पॉझिटीव्ह आला. सदर इसम पत्नी, ३ मुले, रिक्षा चालक, खासगी डॉक्टर व दोन मेडिकल दुकानदारांच्या संपर्कात आला असल्याचे दिसून आले आहे. त्याची प्रकृती चांगली असल्याचे सांगण्यात आले.
गेले दोन दिवस पनवेल महापालिका हद्दीत करोनाचा एकही रुग्ण सापडला नव्हता. त्यामुळे पनवेलकरांसह रायगडकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता. मात्र आज एकाच दिवशी जिल्ह्यात करोनाचे पाच नवे रुग्ण सापडल्याने रायगडकर तणावाखाली आले आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रात मुंबई हा करोना साथीचा केंद्रबिंदू ठरला आहे. मुंबईत करोनाबाधीत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याने सगळेच चिंतातुर होते. मात्र, मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने करोनाचा वाढता ग्राफ खाली आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न चालवल्याने त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. गेल्या तीन दिवसात करोनाबाधीत नवीन रुग्णांची संख्या निम्म्याहूनही खाली आली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times