Vidhan Parishad Election 2022 | आता विधानपरिषद निवडणुकीत देवेंद्र भुयार यांनी एक अजब प्रस्ताव मांडला आहे. विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार पडल्यास त्याचे खापर अपक्ष आमदारांवर फुटू नये,यासाठी देवेंद्र भुयार यांनी ही भूमिका घेतली आहे. त्यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, विधानपरिषद निवडणुकीत मविआचा उमेदवार पराभूत झाला तर तो अपक्षांनीच पाडला, असे संजय राऊत त्यादिवशी १०० टक्के बोलतील.

हायलाइट्स:
- मी मतदान करताना संजय राऊत माझ्या टेबलाच्या समोर उभे राहतील
- मी त्यांना मत दाखवून मतपेटीत टाकेन
- परवाच्या बैठकीत महाविकास आघाडीसमोर एक प्रस्ताव मांडणार आहे
या पार्श्वभूमीवर आता विधानपरिषद निवडणुकीत देवेंद्र भुयार यांनी एक अजब प्रस्ताव मांडला आहे. विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार पडल्यास त्याचे खापर अपक्ष आमदारांवर फुटू नये,यासाठी देवेंद्र भुयार यांनी ही भूमिका घेतली आहे. त्यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, विधानपरिषद निवडणुकीत मविआचा उमेदवार पराभूत झाला तर तो अपक्षांनीच पाडला, असे संजय राऊत त्यादिवशी १०० टक्के बोलतील. या गोष्टीची जाणीव मला आहे. त्यामुळे मी एकचं ठरवलंय की, मी परवाच्या बैठकीत महाविकास आघाडीसमोर एक प्रस्ताव मांडणार आहे. त्यानुसार विधानपरिषद निवडणुकीसाठी मी मतदान करायला जाईन तेव्हा संजय राऊत यांना माझ्यासोबत पाठवावे. मी मतदान करताना संजय राऊत माझ्या टेबलाच्या समोर उभे राहतील. मी त्यांना मत दाखवून मतपेटीत टाकेन, असा प्रस्ताव देवेंद्र भुयार यांनी मांडला आहे. हे शक्य नसेल तर दुसरा पर्याय म्हणजे विधानपरिषदेत मतदाना करण्याचा माझा अधिकार संजय राऊत यांनाच देऊन टाकावा. ते त्यांच्याच हाताने मतपेटीत मत टाकतील, असेही भुयार यांनी म्हटले. देवेंद्र भुयार यांच्या या वक्तव्यावर आता संजय राऊत काय प्रतिक्रिया देणार, हे पाहावे लागेल.
संजय राऊत नेमकं काय म्हणाले होते?
राज्यसभा निवडणुकीत अपक्ष आमदार फुटल्यामुळे शिवसेनेच्या उमेदवाराचा निवडणुकीत पराभव झाल्याचं विधान राऊत यांनी केले होते. देवेंद्र भुयार, शामसुंदर शिंदे, संजय मामा शिंदे या अपक्ष आमदारांची नावं घेत राऊत यांनी घोडेबाजाराचे आरोप केले होते. राऊतांच्या विधानांमुळे मविआला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांमध्ये अविश्वास निर्माण होईल. अनेक आमदारांनी आताच त्यांची नाराजी बोलून दाखवली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर ही नाराजी मविआला परवडणारी नाही, असा सूर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी आळवला होता.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : allow shivsena sanjay raut to come with me for vidhan parishad election 2022 voting says devendra bhuyar
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network