आलियानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘ब्रह्मास्त्र’चा ट्रेलर शेअर केला होता. त्यानंतर अमृतानं कमेंट करत तिची प्रतिक्रिया दिली. अमृतानं हा ट्रेलर खूपच भारी आहे. नेत्रदीपक आहे, असं म्हटलं आहे. (Ooooooohhhhhhhhhhh goooddddddd spectacular mind blowing out of this world)
अमृतानं ही कमेंट केल्यानंतर अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे. एका युझरनं म्हटलं की, ‘उगाच ओव्हर रिअॅक्ट होऊ नकोस, इतकाही छान नाही, हे तुलाही माहित आहे’. तर दुसऱ्या एका युझरनं म्हटलं आहे की, इतकंही ओव्हर रिअॅक्ट करू नकोस, तू मार्वल मूव्ही पाहिल्या नाहीत का? तर आणखी एकानं ‘बॉलिवूडमध्ये काम मिळण्यासाठी तू असं बोलते आहेस’ असं म्हटलं आहे.
अमृतानं आलियासोबत राझी या चित्रपटात काम केलं होतं. दोघींच्या अभिनयाचं तेव्हा कौतुक झालं होतं.

ट्रेलर हिट
चित्रपट ज्या-ज्या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे त्या सर्व भाषांमधील ट्रेलरचे एकूण व्ह्यूज एका दिवसात कोटींच्या घरात गेले आहेत. शिवाय या सर्व भाषांमधील ट्रेलर्सना बऱ्याच प्रतिक्रियाही मिळाल्या आहेत. ट्रेलरमधील कलाकारांच्या अभिनयाची, दिग्दर्शनाची, सादरीकरणाची प्रशंसा होतंच आहे; शिवाय चित्रपटातील व्हीएफएक्सचंही विशेष कौतुक होतंय. आता चाहते हा सिनेमा मोठ्या पडद्यावर बघण्याची वाट बघत आहेत.