सातारा : साताऱ्यामध्ये ट्रिपल मर्डरचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इथे आईचा गळा दाबून खून केल्यानंतर दोन मुलांनाही विहिरीमध्ये ढकलून त्यांचा खून केल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.
दत्ता नारायण नामदास असं आरोपीचं नाव असून ते तो मूळचा राजे बोरगाव ता. जि. उस्मानाबादचा आहे. सध्या तो वेलंग शिरंबे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा इथं राहत होता. या घटनेनंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून कसून चौकशी सुरू आहे.