मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मधली बबिताजी सगळ्यांची आवडती. तिचा अभिनय तर चांगला आहेच, पण तिचं सौंदर्यही अनेकांना वेडं करतं. ती फिटनेसची नेहमीच काळजी घेत असते. आता नाही, अनेक वर्ष सातत्यानं ती फिटनेसची काळजी घेतेय. मुनमुन दत्तानं १८ वर्षांपूर्वीचा फोटो शेअर केला. तिची पहिली टीव्ही मालिका हम सब बाराती होती. त्यातला हा फोटो आहे. या फोटोत तिचा फिटनेसही लक्षात येतोय. आश्चर्य म्हणजे, या फोटोत जेठालाल म्हणजे दिलीप जोशीही आहे. म्हणजे त्यांची साथ किती जुनी ते लक्षात येतंय.

‘तारक मेहता…’ मालिकेत अशी होणार दयाबेनची एन्ट्री, निर्मात्यांनी केला खुलासा

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतल्या लोकप्रिय अभिनेत्रीनं हम सब बाराती मालिकेतही मिठीची व्यक्तिरेखा साकारली होती. मुनमुनने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

दिन्यार काॅन्ट्रॅक्टरना पाहून चाहते भावुक


मुनमुन दत्तानं इन्स्टाग्रामवर १८ वर्षांपूर्वीचा फोटो शेअर केला. त्यात दिवंगत अभिनेते दिन्‍यार कॉन्‍ट्रॅक्‍टर (Dinyar Contractor) पण आहेत. दिन्यार यांनी हम सब बाराती मालिकेत वृंदावन मेहता यांची व्यक्तिरेखा उभी केली होती. ते घराघरात पोहोचले होते.

मुनमुन दत्ताचा फिटनेस

मुनमुन दत्ता

मुनमुन दत्तानं सोशल मीडियावर दोन फोटो शेअर केले आहेत. एकात ती डान्स स्टेप करताना दिसतेय. तिनं घागरा चोळी घातली आहे. ती फक्त सुंदर दिसत नाहीय, तर एकदम फिटही दिसतेय. फॅन्सचं म्हणणं आहे, इतक्या वर्षांनीही काही बदललेलं नाही. ती आजही तितकीच सुंदर आहे. हे फोटो शेअर करत मुनमुनने कॅप्शन दिली आहे, Circa २००४ हम सब बाराती आठवणी.

स्वप्न पाहावं तर असं! अजय पुरकर यांनी बांधलं ऐतिहासिक भूमीत घर

दिलीप जोशीही होते सोबत

दिलीप जोशी आणि मुनमुन दत्ता


तारक मेहतामध्ये बबिताजी आणि जेठालालची केमिस्ट्री खूप जुनी आहे. या फोटोत दिलीप जोशीही आहेत. दोघांनी अनेक मालिकांमध्ये एकत्र काम केलं आहे.

अभिनेत्री जुई गडकरी निघाली केदारनाथाच्या दर्शनाला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here