मुंबई : करण जोहर आणि अयान मुखर्जी यांचा महत्त्वाकांक्षी सिनेमा ‘ब्रह्मास्त्र’ चा नुकताच ट्रेलर रिलीज झाला आहे. हा सिनेमा तयार करण्यासाठी थोडेथोडके नाही तर तब्बल नऊ वर्षे लागली. त्यानंतर हा सिनेमा आता प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.

पोलिसांनी एका सुगावाने कसा उघड केला मूसेवाला हत्येमागील कट?

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमामध्ये मुख्य भूमिका आहेत. या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये शाहरुख खान असल्याचा जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. काही चाहत्यांनी तर ट्रेलरचे काही स्क्रिन शॉट काढून ते सोशल मीडिवर शेअर करत शाहरुख असल्याचा दावा केला आहे. या चर्चांमध्ये आणखी एका चर्चेला सुरुवात झाली आहे.


ती म्हणजे ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमात रणबीरची एक्स गर्लफ्रेंडदेखील दिसणार आहे., वाचून आश्चर्यचकीत झालात ना… परंतु मीडियामध्ये तशा आशयाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. मीडिया रिपोर्टनुसार दीपिकानं करणबरोबर अनेक सिनेमांत काम केलं आहे. तिनं अयान आणि करणची निर्मिती असलेल्या ‘ये जवानी है दीवानी’ सिनेमातही काम केलं आहे. त्यामुळे या दोघांच्या ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमातही दीपिका पादूकोण पाहुणी कलाकार म्हणून दिसणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

ट्रेलर ‘ब्रह्मास्त्र’ चा, पण ट्रोलर्सच्या निशाण्यावर अमृता खानविलकर…वाचा काय आहे कनेक्शन

रणबीर- दीपिका

दीपिकाच्या कामाबद्दल सांगायचं तर सध्या ती हैदराबादमध्ये तिच्या आगामी सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. याच सिनेमाच्या चित्रीकरणावेळी तब्येत बिघडल्यानं तिला रुग्णालयात न्यावं लागलं होतं. दीपिकाच्या हृदयाचे ठोके जलद झाल्यानं तिला अस्वस्थ वाटतं होतं. परंतु योग्य उपचारानंतर तिची प्रकृती स्थिर झाली आणि ती पुन्हा चित्रीकरणाच्या ठिकाणी पोहोचली. दीपिकाच्या आगामी सिनेमात अमिताभ बच्चन आणि प्रभास आहेत.

निस्वार्थ प्रेम!, सिनेमा पाहून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनाही रडू आलं, नेमकं असं काय घडलं?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here