मुंबई: मराठी सिनेमाचं बजेट वाढलं तसं इंडस्ट्रीत ग्लॅमर आलं. याच ग्लॅमरला भुलून अनेक निर्माते, तंत्रज्ञ, कास्टिंग डिरेक्टर्स मराठीत आले. ही इंडस्ट्रीची लख्ख बाजू असली तरी याला एक काळी किनारही लाभली आहे.
ट्रेलर ‘ब्रह्मास्त्र’ चा, पण ट्रोलर्सच्या निशाण्यावर अमृता खानविलकर…वाचा काय आहे कनेक्शन
हिंदीसह इतर भाषांत असलेला कास्टिंग काऊचचा प्रकार आपल्या इंडस्ट्रीत डोकावू लागला .यापूर्वी यावर उघड बोललं जात नसे. पण आता इंडस्ट्रीतल्या प्रतिनिधी असलेल्या अनेक नायिका यावर उघड बोलायला लागल्या आहेत. मीटिंग्जना मिळणाऱ्या हिंट्स, नको त्या अपेक्षा बाळगून असलेल्या नजरा या नायिका बरोब्बर ओळखतात. ही झाली आजची गोष्ट. पण हे सर्व काही गेल्या काही वर्षांत वैगेरे सुरू झालं असं नाही. मराठी सिनेसृष्टीतील एका अनुभवी आणि प्रसिद्ध अभिनेत्रीनं बऱ्याच वर्षांपूर्वीचा एक वाईट अनुभव शेअर केला आहे.

आई कुठे काय करते : वडाला फेऱ्या मारताना संजनाचा धागाच तुटला, Video झाला Viral
विविध कलाकृतींमधून घराघरांत पोहोचलेला चेहरा म्हणून अभिनेत्री सुलेखा तळवलकर यांची ओळख आहे. सध्याच्या काळाबरोबर चालण्याच्या हेतूनं त्यांनी युट्यूब चॅनल सुरू केलं. त्यांच्या ‘दिल के करीब’ या कार्यक्रमातून मनोरंजनविश्वातील कलाकारांचा आजवरचा प्रवास प्रेक्षकांना कळतोय. या शोमध्ये नुकतीच अभिनेत्री अर्चना नेवरेकर यांची मुलाखत घेण्यात आली . या मुलाखतीत अर्चना यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर केल्यात. तसचं सिनेसृष्टीत आलेले चांगले-वाईट अनुभवही सांगितल्या.

अर्चना यांनी बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत कामाला सुरुवात केली. सिनेसृष्टीतील करिअरमध्ये त्यांनी मालिका , मराठी चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या पण त्यांना हवी तितकी प्रसिद्धी त्यांना मिळाली नाही. याची त्यांना खंत वाटत नाही, असं त्या स्वत: म्हणतात. हे सांगत असतानाच त्यांनी त्यांना आलेला एक कटू अनुभवही सांगितला.

एका मोठ्या हिंदी सिनेमासाठी अर्चना यांनी निवड झाली होती. सिनेमाचं नाव सांगता येणार नाही, कारण आता त्याचे वाईट परिणाम होतील, असं त्या म्हणाल्या. ‘ या चित्रपटासाठी दोन मुलींची निवड करण्यात आली होती. त्यातली मी एक होते. या सिनेमात मी भूमिका करणार हे नक्की झालं होतं. तुमचं काम पाहिलंय, फोटोही छान आहेत, तुम्ही हा सिनेमा करतायत, असं मला सांगण्यात आलं होतं. पण तुम्हाला या चार लोकांसोबत चार दिवस राहावं लागेल , अशी अट त्यांनी माझ्यासमोर ठेवली होती’, असा धक्कादायक खुलासा अर्चना यांनी या मुलाखतीत केला. ही ऑफर मी स्पष्टपणे नाराकरली असंही त्या म्हणाल्या.

माझ्या सोबत दुसरी मुलगी होती तिनं त्यांची ऑफर स्वीकारली होती. आपल्या बॅचमधली ती आज टॉपला आहे’, असंही अर्चना यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here