जळगाव : अमळनेर तालुक्यातील शिरूड येथे मुलाला गळफास लावून नंतर आईनेही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. पूर्वी सोनवणे आणि वृषांत सोनवणे असं मृत माय-लेकाचं नाव आहे. कौटुंबिक वादातून महिलेकडून हे टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील‍ शिरूड येथील माहेर असलेल्या पूर्वी सोनवणे यांचे सासरी वाद सुरू होते. त्यामुळे पूर्वी सोनवणे या मुलगा वृषांत याच्यासोबत माहेरी आईवडिलांकडे वास्तव्याला होत्या. दरम्यान मध्यरात्री त्यांनी मुलाला गळफास देवून नंतर स्वत:ही गळफास घेवून आत्महत्या केली. शुक्रवार १७ जून रोजी सकाळी पूर्वी सोनवणे यांचे वडील वसंत पाटील हे वरच्या मजल्यावर गेले असता मुलीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

‘काही चूक झाली असेल तर समोर येऊन बोलूयात’; मुलाला धमकी येताच वसंत मोरेंचं वक्तव्य

मुलीसह नातवाचा मृतदेह पाहून वसंत पाटील यांनी मोठा आक्रोश केला. त्यानंतर शेजारी राहणाऱ्या नातेवाईक व ग्रामस्थांनी पाटील यांच्या घराकडे धाव घेतली. पूर्वी सोनवणे सुसाईड नोट लिहून आत्महत्या केल्याचे समजते. मात्र या सुसाईड नोटमध्ये काय लिहिलं आहे, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नसल्याने आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेलं नाही.

दरम्यान, अमळनेर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

माता न तू वैरणी ! नुकत्याच जन्मलेल्या बाळाला फेकलं उकीरड्यावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here