या घटनेविषयी अधिक माहिती अशी की जालना जिल्ह्यातील सातारा येथील सातवीच्या वर्गात शिकणारा १२ वर्षीय पृथ्वीराज मिटे याला त्याच्या आईवडिलांनी सेलू शहरातील संकल्प अकॅडमी मध्ये शिक्षणासाठी ठेवले होते. ७ जून रोजी त्याच्या पोटात दुखत असल्याने सकाळी त्याने अकॅडमीचे संचालक पृथ्वीराज खंदारे यांना याबाबतची माहिती दिली.
‘तुझे नेहमीचेच नाटक आहे माझी झोप मोडली’
खंदारे यांनी ‘तुझे नेहमीचेच नाटक आहे माझी झोप मोडली’,असे म्हणून त्या १२ वर्षीय मुलाला रुळाने पाठीवर व डाव्या मांडीवर मारहाण करून जखमी केले. घडलेला प्रकार मुलाने घरी सांगितल्यानंतर मुलाची आई योगिता मिटे यांनी पोलीस स्टेशन गाठून अकॅडमीचे संचालक योगेश खंदारे यांच्या विरोधात सेलू पोलीस ठाण्यात गुरुवारी १६ जून रोजी रात्री दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सय्यद अन्वर करत आहेत.
शासकीय नियमाचे पालन न करता अकॅडमी सुरू
सेलू शहरामध्ये मागील काही दिवसापासून बऱ्याच अकॅडमी कुठल्याही शासकीय नियमाचे पालन न करता अकॅडमी चालवल्या जात आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र, या सर्व प्रकाराकडे शिक्षण विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे.