परभणी : केंद्र सरकारने सैन्यदलात भरतीसाठी सुरू केलेली अग्निपथ योजना बंद करावी या मागणीसाठी सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर युवक आंदोलन करत आहेत. याचा विपरित परिणाम रेल्वेच्या सेवेवर झाला आहे. त्यामुळे मराठवाड्यातून धावणारी सिकंदराबाद-शिर्डी एक्सप्रेस गाडी आज अचानक रद्द करण्यात आली आहे. तर सिकंदराबाद देवगिरी एक्सप्रेस 340 मिनिटे उशिराने धावणार आहे, अशी माहिती दक्षिण मध्ये रेल्वेच्या नांदेड विभागाकडून देण्यात आली आहे. रेल्वेने घेतलेल्या या निर्णयामुळे मराठवाड्यातील प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.

केंद्र सरकारनं सैन्य दलातील भरतीसाठी सुरु केलेल्या अग्निपथ योजनेला उत्तर भारतातील राज्यातील युवकांनी विरोध केला. बिहार, उत्तर प्रदेशमध्ये सुरु झालेल्या आंदोलनाचं लोण दक्षिण भारतात पोहोचलं आहे. तेलंगणामध्ये सिकंदराबादमध्ये रेल्वे स्टेशनवर हिंसक आंदोलन केलं आहे. आज सिकंदराबादमध्ये शेकडो तरुणांनी एकत्र येत रेल्वे गाड्यांचं आणि स्टेशनवरील दुकानांचं नुकसान केलं. सिकंदराबादमध्ये सकाळी झालेल्या आंदोलनात १३ जण जखमी झाल्याची माहिती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या एका युवकाचा मृत्यू झाला आहे. सिकंदराबादमधील स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारनं सीआरपीएफच्या तीन तुकड्या पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
अग्निपथच्या विरोधाचं लोण दक्षिणेत, सिकंदराबादमध्ये रेल्वे पेटवली, गोळीबारात एकाचा मृत्यू
विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे रेल्वे सेवेत विपरित परिणाम झाला आहे. परिणामी सिकंदराबाद शिर्डी एक्सप्रेस गाडी अचानक रद्द करण्यात आली आहे. तर मुंबईकडे धावणारी सिकंदराबाद मुंबई एक्सप्रेस देवगिरी 340 मिनिटे उशिराने जाणार आहे. यासोबतच सिकंदराबाद मनमाड अजिंठा एक्सप्रेस गाडी देखील रद्द करण्यात आली आहे. परिणामी मराठवाड्यातील बीड,परभणी, जालना औरंगाबाद, नांदेड जिल्ह्यातील प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.

अनेकांनी केले आरक्षण

शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनाला जाण्यासाठी सिकंदराबाद शिर्डी एक्सप्रेस गाडीने मराठवाड्यातील अनेक व्यक्तींनी आरक्षण केले आहेत मात्र गाडी अचानक रद्द करण्यात आली असल्याचे त्यांनी केलेल्या आरक्षणाचा काहीच उपयोग होणार नाही. तर मुंबईकडे धावणारी देवगिरी एक्सप्रेस उशिराने धावणार असल्याने तेलंगणा आणि महाराष्ट्रातील प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here