याबाबत सविस्तर माहिती अशी की, एक १२ वर्षाची मुलगी रानात शेळ्या चारण्यासाठी गेली होती. ती रस्त्याने घरी जात असताना अजिंक्य मालुंजकर हा त्याच रस्त्याने जात होता. त्याने वाहन थांबवून पीडित मुलीस गाडीवर बसण्यास सांगितले. मुलीने नकार दिला असता तो म्हणाला की, तुला करोना झाला आहे. तुला तुझ्या घरी सोडतो. त्यानंतर त्याने पीडितेस गाडीवर बसवल व पुढे उसात शेतात नेले. तुला करोना झाला आहे. असे म्हणत या तरुणाने तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मुलीने स्वत:ची सुटका करीत थेट घर गाठले. तेथे गेल्यानंतर हा प्रकार पालकांना सांगितला असता त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठले.
दरम्यान, पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस निरीक्षक आरविंद जोंधळे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत लगेच एक पथक तयार केले. पोलिसांनी काही फोटो पीडित मुलीस दाखविले असता मालुंजकरची ओळख पटली. त्यास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस उप अधीक्षक रोशन पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिपक ढोमणे यांच्या पथकाने ही कारवाई केली. अकोले पोलीस ठाण्यात विनयभंग व पोक्सो नुसार संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times