पती लग्नानंतर कायम दूर राहायचा. तो कधीच जवळ यायचा नाही. मी त्याच्या जवळ जायचा प्रयत्न केल्यावर तो दुसऱ्या खोलीत निघून जायचा, असं पीडित महिलेनं पोलिसांना सांगितलं. महिलेला पतीबद्दल शंका आली. तिनं त्याच्यावर नजर ठेवण्यास सुरुवात केली. यादरम्यान तिला पतीबद्दल अनेक धक्कादायक गोष्टी समजल्या. त्यामुळे तिच्या पायाखालची जमीन सरकली.
संध्याकाळ होताच महिलेचा पती महिलांप्रमाणे नटत होता. हेयरबँड, टिकली, कानातले घालत होता. लिपस्टिक लावत होता. महिलेनं याबद्दल विचारणा करताच त्यानं तिला मारहाण केली. पतीनं महिलेला पुण्याहून इंदोरला सोडलं. तो कधीच तिला न्यायला आला नाही. यानंतर महिलेनं पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि न्यायालयात याचिका दाखल केली.
न्यायालयाच्या आदेशानंतर महिला आणि बाल कल्याण विकास विभागानं एक गोपनीय अहवाल तयार करून न्यायालयाला पाठवला. महिला कौटुंबिक हिंसाचाराची बळी ठरल्याचं विभागानं अहवालात म्हटलं. पतीनं महिलेला दरमहा ३० हजार रुपये द्यावेत, असा आदेश न्यायालयानं दिला.
पतीविरोधात न्यायालयात गेलेल्या महिलेनं काही फोटो न्यायमूर्तींसमोर सादर केले. आपला पती महिलांप्रमाणे नटत असल्याच्या दाव्याच्या समर्थनार्थ तिनं हे फोटो पुरावे म्हणून सादर केले. पती आणि त्याच्या काही मित्रांचा एक ग्रुप आहे. ते संध्याकाळी महिलांप्रमाणे नटतात, असा दावा महिलेनं केला.