पिंपरी : जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांची आषाढी वारी सोमवार आणि मंगळवारी पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पालखी मार्गावरील व आजूबाजूच्या परिसरात ड्रोन व ड्रोन सदृश्य कॅमेराने छायाचित्रण करण्यास मनाई करण्यात आली आहे.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याच्या कालावधीत आळंदी शहरात व देहु इथं लाखो भाविक मंदिर परिसरात येत असतात. मात्र, काही लोक ड्रोनव्दारे किंवा ड्रोन सदृश्य कॅमेराव्दारे छायाचित्रण ( शुटींग) करण्याची शक्यता आहे. त्याप्रमाणे आषाढी वारी करीता येणारे भाविक हे मुख्यतः ग्रामीण भागातील असून त्यांना ड्रोन कॅमेरा वापरण्याचे ज्ञान नाही. त्यामुळे अचानक ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्यात आले तर भाविकांमध्ये अफवा पसरवून गडबड गोंधळ उडून चेंगराचेंगरी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड पोलिसांकडून दि.१७ ते २२ पर्यंत ड्रोनव्दारे छायाचित्रण ( शुटींग) करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. करोना संसर्गाचा फटका लहान मुलांना बसणार?; बालरोगतज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती
पालखी मार्गावर फुल, फळ, खेळणी विक्रेते हातगाड्या लावून जमीनीवर बसून त्यांचा माल विक्री करीत असतात. रस्त्याचे दोन्ही बाजुला त्यांचे बसण्यामुळे रस्त्याची रुंदी लहान होवुन पालखी प्रस्थान सोहळ्याचे वेळी त्याचा परिणाम जाणवतो. त्यामुळे गर्दी होवून चेंगराचेंगरी होण्याची दाट शक्यता असते. तसेच गर्दीचा फायदा घेवून गुन्हेगार प्रवृतीचे लोक आपला हेतू साध्य करतात. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
तसेच संपूर्ण पालखी मार्गावर फुल, फळ, खेळणी विक्रेते हातगाडीवाले यांना बसण्यापासुन मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन करण्यात आले आहे.