तबलिगी जमातच्या मरकजसाठी आलेले परदेशी नागरिक व्हिसाचा गैरवापर करत असल्याचे उघडकीस आले. पर्यटन व्हिसावर आलेले असताना ते व्हिसामधील अटीचे उल्लंघन करून धर्मप्रसार करत असल्याचे पोलिस चौकशीत समोर आले आहे. त्यामुळे नगरला आलेले २९ परदेशी नागरिक व त्यांना मदत करणाऱ्या अन्य पाच नागरिकांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. नगरमधील भिंगार, जामखेड, नेवासा पोलिस स्टेशनमध्ये हे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यापैकी सिव्हिलमध्ये उपचार घेत असलेले पाच परदेशी नागरिक सोडून अन्य २९ जणांना आज अटक करण्यात आली आहे. त्यात पाच भारतीयांचा समावेश आहे. ते भाषांतरकार म्हणून त्यांच्यासोबत होते.
दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये मरकजसाठी अनेक देशातील नागरिक आले होते. त्यातील काही जण नगरमधील मुकुंदनगर, जामखेड, नेवासा येथील धार्मिक स्थळी राहिले होते. या तिन्ही ठिकाणी पोलिसांनी कारवाई करून या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी केली. त्यात काही नागरिकांना करोनाची लागण झाल्याचे तपासणीत समोर आले आहे. जिबुती, बेनिन, डिकोटा, आयव्हेरी कोस्ट, घाना, इंडोनेशिया, ब्रुनई या देशातील हे नागरिक आहेत. त्यांना वास्तव्य करण्यास मदत करणाऱ्यांविरूद्ध यापूर्वीच गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यातील चार जणांना करोनाची लागण झाली होती. तर इतरांना सिव्हिलमध्ये विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते.
करोनाची लागण झालेले चौघे करोनामुक्त झाल्याचे डाक्टरांनी स्पष्ट केले. तर विलगीकरणातील २५ जणांची चाचणी निगेटिव्ह आलेली आहे. त्यामुळे या सर्वांना स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी रात्री ताब्यात घेतले. त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना शनिवारी न्यालयासमोर हजर केले जाणार असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक दिलीप पवार यांनी दिली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times