परभणी : दारूच्या नशेत घरातील लोखंडी पाईपला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन एका इसमाने आत्महत्या केल्याची घटना परभणी शहरातील गौस कॉलनी येथे घडली आहे. याप्रकरणी मृत व्यक्तीच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शेख युसूफ शेख दाऊद असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे.
दरम्यान, या घटनेनंतर गौस कॉलनी परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.
चार दिवसात तिसरी घटना
दारूमुळे मृत्यू झाल्याची चार दिवसातील ही तिसरी घटना आहे. सेलू शहरामध्ये दारूचे अतिसेवन केल्यामुळे एका युवकाचा मृतदेह रस्त्याच्या शेजारी आढळून आला होता. त्यानंतर परभणी शहरातील न्यू संभाजीनगर येथे दारूच्या नशेत युवकाने घरात गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यानंतर आता गौस कॉलनी येथे शेख युसूफ शेख दाऊद यांनी आत्महत्या केली आहे.
विम्याचे एक कोटी मिळविण्यासाठी चक्क पत्नीनेच करवून घेतला पतीचा खून