मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पुनर्बांधणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. यात अनेक ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी दिल्यानंतर मनविसेने आता आगामी काळात राज्यात होणाऱ्या कॉलेज निवडणुका आणि सिनेटच्या निवडणुकीसाठी आतापासून प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे पाच वर्षांहून अधिक काळ विसर पडलेल्या कॉलेजांमधील मनविसेच्या विद्यार्थी युनिट उभारणीचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे, तसे आदेशही मनविसेचे नवनियुक्त अध्यक्ष अमित ठाकरे यांनी दिले.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी अमित ठाकरे यांची निवड झाल्यानंतर संघटनेच्या पुनर्बांधणीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. त्यानुसार मनविसेच्या पहिल्या फळीतील पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्राचा दौरा करण्याचे आदेश दिल्यानंतर अमित ठाकरे यांनी स्वत: मुंबईची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. राज्यातील कॉलेजांमध्ये विद्यार्थी निवडणुका आणि विद्यापीठांमध्ये सिनेटच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांसाठी मनविसेने सक्रिय सहभाग नोंदवावा, यासाठी अमित ठाकरे यांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली. त्यामुळे मनविसे आता प्रत्येक कॉलेजमध्ये पुन्हा एकदा विद्यार्थी युनिट सुरू करणार आहे, अशी माहिती मनसेतील सूत्रांनी दिली.

अफगाणिस्तानमध्ये गुरुद्वारावर मोठा हल्ला; अनेक जण मृत्युमुखी पडल्याची भीती

सन २०१६मध्ये मुंबई विद्यापीठ संलग्नित एकूण १२५हून अधिक कॉलेजांमध्ये विद्यार्थी युनिट होते. त्याचा फायदा मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकीत झाला होता. मात्र सन २०१६नंतर मनविसेने त्याकडे दुर्लक्ष केले. याबाबत विद्यार्थ्यांनी लक्ष वेधल्यानंतर आता अमित ठाकरे यांनी पुन्हा एकदा सर्व कॉलेजांमध्ये विद्यार्थी युनिट सुरू करण्याचा आदेश दिला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here