नवी दिल्ली: क्रोएशियाची महिला फुटबॉलपटू एना मारिया मार्कोविच (Ana Maria Markovic)ला जगातील सर्वात सेक्सी खेळाडू (World’s Sexiest Footballer) म्हटले जाते. पण या ओळखीमुळे ती स्वत: हैराण झाली आहे. फुटबॉलपटू एना मारिया ही अतिशय सुंदर दिसते. यामुळेच तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे.

२२ वर्षीय मारियाने गेल्या वर्षी क्रोएशियाकडून पदार्पण केले होते. पण एका मुलाखतीत आपल्यावर लागलेल्या या टॅगवरून तिने नाराजी व्यक्त केली. जगातील सर्वात सेक्सी फुटबॉलपटूबद्दल जाणून घेऊयात…

वाचा- पंतच्या हातून उतरणार ग्लोव्हज; विश्वचषकात कार्तिक बनणार टीम इंडियाचा तारणहार

Ana-Maria-Markovic

एना मारिया मार्कोविचचा जन्म स्वित्झर्लंडमध्ये झाला. तिची आई क्रोएशियाची आहे. फॉरवर्ड मारिया क्रोएशियाकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत असते. आतापर्यंत तिने पाच आंतरराष्ट्रीय सामन्यात १ गोल केलाय.

वाचा- फुटबॉल इतिहासात प्रथमच असे होणार; वर्ल्डकपचे आयोजन एकाच वेळी…

Ana-Maria-Markovic-4

सौदर्यांमुळे एना मारियावर सेक्सी फुटबॉलपटूचा टॅग लागण्यात वेळ लागला नाही. यामुळे सोशल मीडियावर एनाला अनेक अश्लिल मेसेज येऊ लागले. यामुळेच ती वैतागली आहे.

वाचा- एका महिन्यात दोन वेळा; क्रिकेटमध्ये आजवर कोणावर अशी नामुष्की आली नाही

सोशल मीडियावर अनेक पुरुष तिला स्वत:चे अश्लिल फोटो पाठवतात. एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत एनाने या गोष्टीचा खुलासा केला. यामुळेच एनाने इंस्टाग्रामवरील तिचे अकाउंट Private केले आहे.

Ana-Maria-Markovic-3

अनेकदा लोक तिला मजेदार मेसेज देखील करतात असे एनाने सांगितले. काही जण तिला म्हणतात आम्हाला तुझी सेवा करायची आहे. काहींना सराव झाल्यानंतर माझे बुट साफ करायचे आहेत.

वाचा- ऐतिहासिक… इंग्लंडने रचला धावांचा एव्हरेस्ट; नव्या विश्वविक्रमाला घातली गवसणी

Ana-Maria-Markovic-5

सध्या एना स्वित्झर्लंडच्या ग्रासहुपर एफसी क्लबकडून खेळते. इंग्लंडमधील फुटबॉल क्लब चेल्सीकडून खेळण्याचे तिचे स्वप्न आहे. यासाठी ती मॉडलिंगचे ऑफर देखील नाकारू शकते. क्रिस्टियानो रोनाल्डो आणि लुका मोडरिच हे तिचे आवडते खेळाडू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here