नवी दिल्लीः केंद्रीय गृहमंत्रालाने सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना पत्र लिहिलं आहे. रोहिंग्या आणि तबलीघी जमातमधील कनेक्शनचा तपास करावा. रोहिंग्या मुस्लिम आणि त्यांच्याशी संबंधीत असलेल्यांची करोना तपासणी करावी. यासंबंधी आवश्यक ती पावलं उचलावी, असं गृहमंत्रालयाने पत्रात म्हटलं आहे.

दिल्लीच्या निझामुद्दीनमधील तबलीघी जमातच्या मरकझमधील धार्मिक कार्यक्रमात रोहिंग्याही सहभागी झाले होते. यामुळे त्यांना करोनाचा संसर्ग झाला असण्याची शक्यता आहे, असं गृहमंत्रालयाने म्हटलंय. ज्या राज्यांमध्ये रोहिंग्या राहत आहेत त्या राज्यांचा उल्लेखही पत्रात केला आहे. खासकरून नवी दिल्ली, जम्मू-काश्मीर, पंजाब आणि हरयाणा येथे तपास करावा, असं सांगण्यात आलंय.

तेलंगणच्या हैदराबादमध्येही रोहिंग्यांचा कॅम्प आहे. तिथल्या रोहिंग्या समाजातील काही जणांनी हरयाणातील मेवातमध्ये तबलीघी जमातच्या कार्यक्रमात उपस्थिती लावली होती. पुढे हेच सगळे जण दिल्लीच्या निझामुद्दीनमधील तबलीघी जमात मरकझमधील कार्यक्रमात सहभागी झाले होते. रोहिंग्या समाजाशी संबंधित काही नागरिक दिल्लीच्या श्रम विहार आणि शाहीनबागमध्येही गेले होते.

जे तबलीघीच्या कार्यक्रमात गेले होते ते रोहिंग्या समाजातील नागरिक आपल्या कॅम्पमध्ये परतलेले नाहीत. तसंच ते पंजाबमधील डेराबस्सी, जम्मू आणि काश्मीरमधील कार्यक्रमातही सहभागी झाले होते, असं गृहमंत्रालयाने पत्रात नमूद केलं आहे.

निझामुद्दीनमधील तबलीघी जमात मरकझमधील कार्यक्रमात उपस्थिती लावल्याने रोहिंग्या मुस्लिम आणि त्यांच्या निकटवर्तीयांची करोना चाचणी होणं गरजेचं आहे. हे पत्र उपसचिव, अतंर्गत सुरक्षा विभाग १ च्या श्रीनिवासु यांनी लिहिले आहे. हे पत्र मुख्य सचिवांसह आणि सहकाऱ्यांना डीजीपी आणि दिल्ली पोलीस आयुक्तांनाही पाठवण्यात आलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here