नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा – सारंगखेड्या रत्यावर दोन दुचाकींच्या धडक झाल्यानंतर मागून येणारा कंटेनरने दुचारीस्वारांना चिरडल्याने दोन जण जागीच ठार झाले आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.
अपघातात मयत दोन्हीही मध्यप्रदेश खेतीय येथील रहिवाशी असून शिरपुर येथून ते खेतीयाकडे जात होते. तर दुसऱ्या दुचाकीवरील एकजण गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सारंगखेडा पोलीस याबाबतचा अधिकचा तपास करत आहे.