Pankaja Munde : सध्या विधानपरिषदेची निवडणूक लागली आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. या निवडणुकीत भाजपकडून पुन्हा एकदा पंकजा मुंडे (pankaja Munde) यांना डावलण्यात आलं आहे. या आधीही राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत त्यांच्या नावाची चर्चा सुरु होती. परंतू त्यांना संधी मिळाली नाही. उमेदवारी न मिळाल्यानं पंकजा मुंडे यांचे समर्थक नाराज झाले आहेत. अशातच पंकजा मुंडे या  21 जूनला पाथर्डीतीली मोहटा देवीचं दर्शन घेणार आहेत. यावेळी त्या पाथर्डीतील भाजप कार्यकर्त्यांशी साधणार संवाद साधणार आहेत.

पंकजा मुंडे या 21 जूनला मोहटा देवीचं दर्शन घेणार आहेत. यावेळी त्या पाथर्डीतील भाजप कार्यकर्त्यांशी साधणार संवाद साधणार आहेत. तसेच यावेळी त्या मुकुंद गर्जे या कार्यकर्त्याचीही घेणार भेट घेणार आहेत. पंकजा मुंडे यांना भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर मुकुंद गर्जे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आता पंकजा मुंडे त्या कार्यकर्त्याची भेट घेणार आहेत.

पंकजा मुंडे यांच्या स्वागताची जोरदार तयारी 

दरम्यान, 21 जूनच्या पंकजा मुंडे यांच्या स्वागताची कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे.  ‘चलो मोहटादेवी’ असे बॅनर सोशल मीडियावर झळकत असताना दिसत आहेत. भाजपकडून पंकजा मुंडे यांना डावलल्याची कार्यकर्त्यांकडून भावना व्यक्त केली जात आहे. आता त्यावर पंकजा मुंडे काय बोलणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यामुळं पंकजा मुंडेंच्या दौऱ्याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे.

भाजपकडून पंकजा मुंडे यांना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांच समर्थक नाराज झाले आहेत. 21 जूनला देवीचं दर्शन घेतल्यानंतर पंकजा मुंडे भाजपच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. आपल्या धडाकेबाज वक्तृत्वासाठी प्रसिद्ध असलेल्या पंकजा गोपीनाथ मुंडे पुन्हा एकदा आमदारकीपासून वंचित राहिल्या आहेत. भाजपने पाच उमेदवारांची घोषणा केली त्यात पंकजा मुंडे यांना संधी मिळाली नाही. उलट भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष आणि ओबीसी समाजातून येणाऱ्या उमा खापरे यांना आमदारकी दिली आहे. याबद्दल केंद्रीय पातळीवरुन निर्णय झाल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता. पंकजा मुंडे सध्या राज्याच्या राजकारणात फारशा सक्रिय नाहीत. त्यांच्यावर मध्यप्रदेशच्या सहप्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. परंतु ओबीसींच्या मुद्द्यावर त्यांनी आक्रमकपणे भूमिका मांडली होती. त्यामुळे सध्याच्या घडामोडी पाहता पंकजा मुंडे यांना संधी मिळेल असं वाटलं होतं पण ते झालं नाही.

महत्वाच्या बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here