parbhani news marathi: रागात म्हणाला, ‘माझ्याजवळ सिलेंडर नाही, एकदा सांगितलेले समजत नाही’; वाचा त्यानंतर काय झाले – a man who went to ask for a gas tank was brutally stabbed to death in parbhani
परभणी : शेजाऱ्याला दिलेली गॅसची टाकी मागण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीची कुर्हाडीने वार करून निर्घुण हत्या करण्यात आल्याची घटना परभणी शहरातील क्रांती नगर येथे शुक्रवारी रात्री घडली आहे. याप्रकरणी मयताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख जावेद शेख युसुफ असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस शोध घेत आहेत.
परभणी शहरातील क्रांती नगर येथे राहणारे शेख जावेद शेख युसुफ वय ४५ वर्ष यांनी घराशेजारी राहणाऱ्या जावेद पठाण गफार पठाण याला गॅसची टाकी दिली होती. शुक्रवारी रात्री शेख जावेद शेख युसुफ हे गॅसची टाकी मागण्यासाठी गेले असतात जावेद पठाण गफार पठाण याने आता माझ्याजवळ टाकी नाही. नंतर देतो. तुला एकदा सांगितले समजत नाही का असे म्हणून वाद घातला आणि शिवीगाळ केली. त्यानंतर शेख जावेद शेख युसुफ यांच्या गळ्यावर आणि मानेवर कुर्हाडीने वार केले. यामध्ये शेख जावेद यांचा मृत्यू झाला. SSC Result 2022: दहावीच्या निकालानंतर जुळ्या भावांची जोरदार चर्चा, निकाल पाहताच घरचेही चकीत घटनेची माहिती समजताच सहाय्यक पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार ,पोलीस निरीक्षक शरद जऱ्हाड, पोलीस कर्मचारी जंगम, भोळे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी मयताची पत्नी परवीन बेगम यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी जावेद पठाण गफार पठाण याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.