विधान परिषदेत मतांची फाटाफूट टाळण्यासाठी सगळेच पक्ष कामाला लागले आहेत. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपच्या आमदारांचा वेगवेगळ्या हॉटेलमध्ये आहे. मतांची फोडाफोड टाळण्यासाठी सारेच पक्ष दक्ष आहेत.

हायलाइट्स:
- विधान परिषदेच्या तोंडावर हॉटेल पॉलिटिक्स
- शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेसचे आमदार हॉटेल मुक्कामी
- मतांची फाटाफूट टाळण्यासाठी प्रयत्न सुरू
राज्यसभेच्या निवडणुकीत सहाव्या जागेवर शिवसेनेचे उमेदवार संजय पवार पराभूत झाले. भाजप नेते धनंजय महाडिक यांनी त्यांचा पराभव केला. हा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे स्वत: विधान परिषद निवडणुकीत लक्ष घालत आहेत. काल रात्री आदित्य यांनी हॉटेल वेस्ट इनला जाऊन शिवसेना आमदारांची भेट घेतली. आज आदित्य सेना आमदारांसोबत हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत.
विधान परिषद निवडणुकीत आपला विजय नक्की आहे. पण गाफिल राहू नका, असा शब्दांत शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्या आमदारांना मार्गदर्शन केलं. राज्यसभेतील पराभवाचा वचपा काढण्याची हीच ती वेळ आहे. आपला विजय नक्की आहे. पण गाफिल होऊन चालणार नाही. विधान परिषदेत आपली ताकद दाखवायची आहे. हॉटेलमध्ये असताना नातेवाईक, मित्रांसोबत वावर टाळा. कोणत्याही आमिषाला बळी पडू नका, अशा सूचना वरिष्ठ नेत्यांकडून शिवसेना आमदारांना देण्यात आल्या आहेत.
शिवसेनेचे आमदार पवईतील वेस्ट इन हॉटेलमध्ये मुक्कामाला आहेत. तर राष्ट्रवादीचे आमदार ट्रायडंटमध्ये थांबले आहेत. काँग्रेसनं आपल्या आमदारांचा मुक्काम फोर सीझन्समध्ये ठेवला आहे. आज संध्याकाळी महाविकास आघाडीच्या नेत्यांची एक महत्त्वाची बैठक होणार आहे. राज्यसभा निवडणुकीत गुप्त मतदान नव्हतं. मात्र तरीही मविआचा चौथा उमेदवार पराभूत झाला. अपक्ष आणि लहान पक्षांची मतं भाजपला मिळाली. त्यामुळे मविआला धक्का बसला. त्यातच आता विधान परिषदेला गुप्त मतदान होणार आहे. त्यामुळे मविआची चिंता वाढली आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : minister aditya thackeray meets shiv sena mlas staying in hotel ahead of vidhan parishad election
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network