मुंबई : विधानपरिषद निवडणूक दोन दिवसांवर आल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापू लागलं आहे. विधानपरिषदेच्या १० जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे सहा तर भाजपचे पाच उमेदवार रिंगणात आहेत. राज्यसभा निवडणुकीत सहावी जागा गमवावी लागल्याने झालेली नाचक्की टाळण्यासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आज ट्रायडंट हॉटेलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे.

राष्ट्रवादीच्या आज होणाऱ्या बैठकीला काही अपक्ष आमदारही उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. यामध्ये करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांचाही समावेश असू शकतो. संजयमामा शिंदे हे अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. मात्र शिंदे यांचा भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चांगला संपर्क असून त्यांनी राज्यसभा निवडणुकीत भाजपला मदत केल्याची चर्चा होती. विधानपरिषद निवडणुकीत आमदार शिंदे काय भूमिका घेतात याची उत्सुकता असतानाच ते राष्ट्रवादीच्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे ही निवडणूक जिंकण्यासाठी अजित पवार यांनी आपली पूर्ण ताकद झोकून दिली आहे का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.

रोटावेटर मशीनवर काम करताना एक चूक, ३५ वर्षीय शेतकऱ्याचा चिरडून जागीच अंत

विधानपरिषदेचे गणित कोणाच्या बाजूने?

विधानपरिषद निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला किमान २६ मते मिळवावी लागणार आहेत. १० जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत चार जागांवर भाजप तर पाच जागांवर महाविकास आघाडी मजबूत स्थितीत आहे. मात्र दहाव्या जागेसाठी भाजप आणि महाविकास आघाडीत रंगतदार लढत होणार आहे. परिणामी मतांसाठी घोडेबाजार होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीत नक्की कोण बाजी मारणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here