नंदुरबारमध्ये आढळलेला करोनाबाधीत रुग्ण मालेगावशी संबंधित असल्याची प्राथमिक माहिती आहे. या रुग्णाचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तातडीने पावले उचलत जिल्हा प्रशासनाने संबंधित रुग्ण वास्तव्याला असलेला संपूर्ण परिसर सील करण्याचे काम हाती घेतले आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या दोन-तीन दिवसांपासून करोनाबाधीत नवीन रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. कालच्या आणि आजच्या आकडेवारीची तुलना केल्यास नवीन रुग्णसंख्येत निम्म्यापेक्षा जास्त घट झाली आहे. गुरुवारी राज्यात करोनाचे २८६ नवीन रुग्ण आढळले होते. तर आज करोनाचे फक्त ११८ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. करोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. आज दिवसभरात ३१ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत ३३१ रुग्णांनी करोनाला मात दिली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times