इराणी अभिनेत्री मंदाना करिमीने इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर (Mandana Karimi Twerking Video) केला आहे. तिने यामध्ये बुरखा घातला आहे. ती एका शॉपिंग मॉलमध्ये दिसत आहे. खरेदी करता करता ती अचानक डान्स करू लागते. यावेळी डान्स करताना ती Twerking देखील करते. नेटकऱ्यांना तिचं हे वागणं काही रुचल्याचं दिसत नाही आहे. दरम्यान तिच्या काही चाहत्यांनी अभिनेत्रीचा असा अंदाज आवडल्याचंही म्हटलं आहे.
मंदानाची ही स्टाइल सोशल मीडिया युजर्सना अजिबात आवडली नाही. या पोस्टवर त्यांनी आपली नाराजीही व्यक्त केली आहे. एका यूजरने लिहिले की, ‘हिजाबची अशी खिल्ली उडवू नका. असे काही करण्यापूर्वी एकदा विचार करा.’ अनेकांनी मंदानाच्या हिजाबची खिल्ली उडवल्यामुळे तिला इन्स्टाग्रामवरून अनफॉलो करत असल्याचंही लिहिलं आहे.

बिग बॉस आणि लॉकअपमध्ये केलं काम
मंदानाचा जन्म तेहरानमधील एका मुस्लिम कुटुंबात झाला आहे. तिने काही बॉलिवूड सिनेमातही काम केले आहे. याशिवाय ती ‘बिग बॉस सीझन ९’मध्ये देखील होती. यावेळी ती सेकंड रनरअप ठरली होती. तर कंगना रणौतच्या ‘लॉकअप’मध्ये तिने वाइल्ड कार्ड म्हणून एंट्री केली होती. ती काहीच आठवडे या शोमध्ये होती, पण तिने यावेळी काही धक्कादायक खुलासे देखील केले होते.
हे वाचा-लेकीसह फोटो काढण्यासाठी जान्हवीकडे वडिलांची विनंती, अभिनेत्रीने जिंकलं नेटकऱ्यांचं मन
पतीवर केले आहेत घरगुती हिंसाचाराचे आरोप
मंदानाने 2016 मध्ये बॉयफ्रेंड गौरव गुप्तासोबत लग्न केले, जो मुंबईतील बिझनेसमन आहे. त्यांनी आधी कोर्टात लग्न केले आणि नंतर 2017 मध्ये हिंदू रितीरिवाजांनुसार त्यांनी लग्न केलं होतं. त्याच वर्षी मंदानाने पती आणि त्याच्या कुटुंबावर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. 2021 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. ‘लॉक अप’ शोदरम्यान मंदानाने खुलासा केला होता की तिचा नवरा आणि त्याच्या कुटुंबीयांनी तिचा खूप छळ केला होता.