मुंबई: राज्यसभा निवडणुकीनंतर राज्यात विधान परिषदेची रणधुमाळी सुरू झाली आहे. राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवर चुरस होती. या जागेवर भाजपनं बाजी मारली. शिवसेनेचे उमेदवार संजय पवार पराभूत झाले. तर यांनी कसाबसा विजय मिळवला. राऊत यांना ४२ आमदारांचा कोटा देण्यात आला. त्यातही १ आमदाराचं मत बाद झालं. त्यामुळे राऊत यांनी ४१ मतांसह अगदी काठावरचा विजय मिळवला. असा प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी प्रयत्नशील आहे.

राज्यसभा निवडणुकीवेळी भाजपनं महाविकास आघाडीच्या तीन आमदारांच्या मतदानावर आक्षेप नोंदवला. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांची मतं अवैध ठरवण्याची मागणी भाजपनं निवडणूक आयोगाकडे केली होती. यापैकी कांदे यांचं मत आयोगानं अवैध ठरवलं. त्यामुळे शिवसेनेला धक्का बसला. हा अनुभव पाहता शिवसेनेनं विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे.

शिवसेनेचे सर्व आमदार सध्या पवईतील वेस्टइन हॉटेलमध्ये मुक्कामाला आहेत. या ठिकाणी आमदारांना मतदानाचं प्रशिक्षण दिलं जात आहे. मतदानाची रंगीत तालीम म्हणून हॉटेलमध्ये डमी मतपेटी आणण्यात आली आहे. मतदान कसं करावं, ते करताना कोणती काळजी घ्यावी, याच्या सूचना आमदारांना देण्यात येत आहेत. राज्यसभा निवडणुकीत झालेल्या चुकीची पुनरावृत्ती टाळण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून सुरू आहे.

१० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात
विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जूनला मतदान होणार आहे. १० जागांसाठी एकूण ११ उमेगवार रिंगणात आहेत. १० व्या जागेसाठी भाजपचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप यांच्यात लढत होईल. उमेदवाराला विजयासाठी २७ मतांची आवश्यकता आहे. शिवसेनेकडून आमशा पाडवी आणि सचिन अहिर यांना उमेगवारी देण्यात आली आहे. शिवसेनेकडे असलेलं संख्याबळ पाहता दोन्ही उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here