भर कार्यक्रमात हरवले सिद्धार्थ- कियारा, कुठे आहोत याचं भानच राहिलं नाही
कंगनानं शेअर केली पोस्ट
कंगनानं अग्निपथ योजनेअंतर्गत सैन्यात भर्तीच्या सरकारच्या निर्णयाचं कौतुक केलं आहे. तिनं इन्स्टाग्राम स्टोरीवर ही पोस्ट शेअर केली. तिनं लिहिलं, ‘इस्रायलसारख्या देशांमध्ये आपल्या तरुणांना लष्कराचं प्रशिक्षण घेणं जरुरीचं केलं आहे. प्रत्येक जण काही वर्श तरुणांना लश्कर प्रशिक्षण देतं. त्यामुळे शिस्त, राष्ट्रवाद आणि देशाच्या सीमेचं संरक्षण करण्याचं महत्त्व कळतं. अग्निपथ योजनेचा उद्देश फक्त करियर करणं, पैसे कमावणं नाही. त्यापेक्षाही ते सखोल आहे.

विरोध करणाऱ्यांबद्दल कंगना बोलली
कंगनाने केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेची तुलना गुरुकुल पद्धतीशी केली आहे. ती म्हणते, पूर्वी गुरुकुलमध्ये जात असत. असंच आहे हे. शिवाय वर पैसेही देणार आहेत. खूप सारे तरुण ड्रग्ज आणि पबजीमध्ये वाया गेलेत. त्यांना सुधारण्याची गरज आहे. म्हणून मी या योजनेबद्दल सरकारचं कौतुक करते.’
अरुंधतीचं विमानात बसायचं स्वप्न होणार पूर्ण, अनिरुद्धसाठी मोठा धक्का
कंगनाचे सिनेमे
कंगनाचा धाकड सिनेमा चांगलाच आपटला. आता ती तेजस सिनेमात दिसेल. त्यात ती फायटर पायलटची भूमिका करतेय. याशिवाय इमर्जन्सी सिनेमाचं शूटिंगही करतेय. इंदिरा गांधींवरच्या या सिनेमात ती त्यांचीच भूमिका साकारणार आहे. ती टिकू वेड्स शेरू सिनेमाची निर्मिती करत आहे. त्यात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर मुख्य भूमिकेत आहेत.
पैशांसाठी नाही, देशासाठी कायमस्वरुपी नोकरी द्या; महाराष्ट्रातही अग्निपथला विरोध