घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर बगळ्यांची कत्तल होत असल्याचा प्रकार अभिनेते सयाजी शिंदेंनी समोर आणला आहे. हा प्रकार थांबायला हवा. त्यासाठी पोलीस प्रशासनानं योग्य कारवाई करायला हवी, असं आवाहन शिंदेंनी केलं आहे.

 

sayaji shinde shares video of youths killing herons
<p>सयाजी शिंदेंनी शेअर केला बगळ्यांची कत्तल करणाऱ्या मुलांचा व्हिडीओ</p>

हायलाइट्स:

  • घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर धक्कादायक प्रकार
  • उड्डाणपुलावर मुलांकडून बगळ्यांची कत्तल
  • अभिनेते सयाजी शिंदेंनी शेअर केला व्हिडीओ
मुंबई: काही महिन्यांपूर्वीच सर्वसामान्यांसाठी खुल्या झालेल्या घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवर असलेल्या पालिकेच्या नव्या उड्डाणपुलावर गेल्या काही दिवसांपासून बगळ्यांची हत्या केली जात आहे. आज संध्याकाळी निसर्गप्रेमी अभिनेते सयाजी शिंदे हे या उड्डाणपुलावरून जात असताना त्यांनी हा प्रकार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद केला आणि या मुलांना जाब विचारला. मात्र या मुलांनी बगळ्यांना घेऊन पळ काढला.

उड्डाणपुलाचा अंदाज न आल्याने बगळ्यांचे थवे पुलाच्या एकदम जवळून जात असतात. अशावेळी बाजूच्या वस्त्यांमधील मुले या पुलावर उभे राहून बेचकीच्या सहाय्याने या बगळ्यांना मारून खाली पाडतात आणि नंतर आपल्या सोबत घेऊन जातात. आज हा सर्व प्रकार अभिनेते सयाजी शिंदे यांनी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत मुलांना रोखण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलीस प्रशासनाने लक्ष घालून कारवाई करण्याचे आवाहन शिंदे यांनी केले आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : actor sayaji shinde shares video of youths killing herons at mankhurd ghatkopar bridge
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here