मुंबई: महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या आतापर्यंत ३३२० वर पोहोचली असून मृतांची संख्या २०१ झाली आहे. मात्र, मागील दोन दिवसांपासून नव्या रुग्णांची संख्या घटली आहे. राज्य सरकारसाठी हा मोठा दिलासा आहे. असं असलं तरी करोनाविरुद्धचा लढा सुरूच आहे. जाणून घेऊया आजच्या दिवसभरातील ताज्या घडामोडी…
लाइव्ह अपडेट्स:
>> औरंगाबादेत आतापर्यंत दोन करोनाबाधितांचा मृत्यू, तर दोन महिला करोनामुक्त
>> औरंगाबाद: शहरामध्ये आणखी एक पंधरा वर्षीय मुलगा करोनाबाधित… जिल्ह्यातील बाधितांची संख्या २९
>> रुग्णवाढ कमी होत असली तरी मृतांचा आकडा चिंताजनक; राज्यात आतापर्यंत २०१ करोना बळी
>> राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा पोहोचला ३३२० वर
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times