बदलापूर : कल्याणमध्ये राहणाऱ्या एका २४ वर्षीय तरूणीचा मृतदेह बदलापूर-वांगणी स्थानकादरम्यान रेल्वे रुळावर आढळ्याने खळबळ उडाली होती. सदर तरूणीची इंस्टाग्रामवर बदलापुरातील करण लहाने या तरुणाशी मैत्री झाली होती. पुढे या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि करणने तरुणीला लग्न करण्याचे आश्वासन दिले. मात्र, नंतर करणने जात वेगळी असल्याचे कारण देत तिला नकार दिला. त्यानंतर तरुणीचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळून आला. याप्रकरणी कुळगांव-बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ३०६, ३४ अन्वये आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिम भागातील २४ वर्षीय तरुणीचे बदलापूर-कासगाव परिसरात राहणाऱ्या करण लहाने याच्यासोबत प्रेमसंबध होते. गेली पाच वर्षे करण तिला लग्नाचे आमिष दाखवत होता. करणने वेळोवेळी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप मृत तरुणीच्या नातेवाईकांनी केला आहे.

अमरावतीत पावसाचा धुमाकूळ: ढगफुटी सदृश्य परिस्थिती; दुचाकी गेल्या वाहून

लग्नाला नकार दिल्यानंतर तरुणीच्या कुटुंबियांनी आरोपी करण तसेच त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या घरी जाऊन जाब विचारला. यावेळी करणच्या कुटुंबियांनी तरुणीच्या पालकांना शिवीगाळ करत धमकी देऊन घरातून हाकलून दिले होते. लग्नाला नकार मिळाल्याने सदर तरुणी मानसिकदृष्ट्या खचली होती. त्यातूनच तिने आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, याप्रकरणी तरुणीच्या कुटुंबियांनी कुळगाव-बदलापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मात्र, चार दिवस उलटून देखील आरोपींना अटक झालेली नसल्याने आम्हाला न्याय मिळणार का? असा सवाल करत तरुणीच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे.

केतकी चितळेला जामीन मंजूर, मात्र पुढचे पाच दिवस तुरुंगातच मुक्काम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here