मुंबई: अभिनेत्री काजल अग्रवाल (Kajal Aggarwal) सोशल मीडियावर सध्या विशेष चर्चेत आहे. काजल अलीकडेच आई झाली असून, तिच्या या प्रवासातील विविध अपडेट ती सोशल मीडियावर शेअर करत असते. काजलने तिच्या बाळाचं नाव ‘नील’ ठेवल्यानंतरही विशेष चर्चेत आली होती. दाक्षिणात्य आणि बॉलिवूड सिनेमात कमाल करणारी ही अभिनेत्री आज ३७वा वाढदिवस (Kajal Aggarwal Birthday) साजरा करत आहे. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर ‘प्री बर्थडे डिनर डेट’चा फोटो देखील शेअर केला आहे. १९ जून १९८५ साली काजलचा जन्म झाला. तिने तामिळ, तेलूगू, मल्याळम आणि हिंदी सिनेमात काम करुन अभिनयाची छाप सोडली आहे. देशभरात काजलचे फॅन्स आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

काजलने ‘सिंघम’ (Kajal Aggarwal Singham) या रोहित शेट्टीच्या सिनेमातून बॉलिवूडमध्ये ओळख निर्माण केली. पण तुम्हाला माहितेय का ‘सिंघम’ हा काजलचा पदार्पणचा सिनेमा नाही आहे. तिने २००४ साली ‘क्यो हो गया नं’मधून बॉलिवूड पदार्पण केले होते, त्यात तिने ऐश्वर्याच्या मैत्रिणीची छोटीशी भूमिका साकारली होती. तिने ‘लक्ष्मी कल्याणम’मधून तेलुगू सिनेमात पदार्पण केले. यानंतर ती दक्षिणेतील टॉपची अभिनेत्री बनली आहे. ‘मगधीरा’ या सिनेमाने तिला विशेष स्टारडम दिला. अभिनेत्रीने बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेमामध्ये मोठं नाव कमावलं आहे. मात्र तिला देखील या काळात काही कॉन्ट्रोव्हर्सीजचा सामना करावा लागला आहे.

हे वाचा-हृताचं मन झालं उडू उडू! अभिनेत्रीच्या लग्नाला महिना पूर्ण, रोमँटिक Video शेअर करत म्हणाली..

२०१६ साली काजल ‘दो लफ्जों की कहानी’ या सिनेमात अभिनेता रणदीप हुड्डा याच्यासह दिसली होती. मीडिया रिपोर्टनुसार या सिनेमाची एका कॉन्ट्रोव्हर्सीमुळे विशेष चर्चा झाली. या सिनेमात काजल आणि रणदीप यांच्यामध्ये एक किसिंग सीन दाखवण्यात आला होता. मीडिया रिपोर्टनुसार, या किसिंग सीनची काजलला कल्पना नव्हती. रणदीपने अचानक तिला सीनमध्ये किस करण्यास सुरुवात केल्याचे या अहवालांमध्ये समोर आले होते.

दरम्यान काजलने या सर्व चर्चा नाकारल्या होत्या. इ टाइम्सच्या एका वृत्तानुसार काजलने असे म्हटले होते की तो सीन स्क्रिप्टमध्ये आहे हे तिला माहित होते. माझ्या पात्राची आणि कथानकाची ती गरज होती असेही स्पष्टीकरण अभिनेत्रीने दिले होते.

काजल अग्रवाल आणि रणदीप हुड्डा

हे वाचा-६ महिन्यांच्या प्रेग्नेंट महिलेने दिली डान्स ऑडिशन, DID Supermoms वर भडकले नेटकरी

याआधी २०१४ साली आणखी एक प्रकार समोर आला होता. काजलचे काही टॉपलेस फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. एका मॅगझिनच्या फोटोशूटचे हे फोटो होते. पण काजलने असा दावा केला होता की तिने असे कोणतेच फोटोशूट केले नव्हते, तिच्या फोटोंसह छेडछाड करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here