मुंबई : गोविंदा आणि सुनिता यांचं ११ मार्च १९८७ मध्ये लग्न झालं. त्या दोघांनी लग्नानंतर चार वर्षे लग्न झाल्याचं जगापासून लपवून ठेवलं होतं. परंतु सुनिताशी लग्न होण्याआधी गोविंदाचं अभिनेत्री नीलम कोठारी (Govinda and Neelam Kothari) हिच्या प्रेमात पडला होता. नीलमच्या प्रेमात गोविंदा इतका आकंठ बुडाला होता की तिच्याशी लग्न करण्यासाठी त्यानं सुनिताशी झालेला साखरपुडा देखील मोडला होता. या गोष्टीचा खुलासा गोविंदानं १९९० मध्ये दिलेल्या एका मुलाखतीमध्ये केला होता.

हे वाचा-काजलला अभिनेत्याने न सांगताच केलं होतं किस? त्या घटनेची झालेली जोरदार चर्चा

नीलमला पाहून गोविंदानं सुनिताला दिला होता सल्ला

गोविंदाचं करीअर त्यावेळी टॉपला होतं. गोविंदानं नीलमसह खूप चित्रपट देखील केले होते. १९९० मध्ये गोविंदानं एका सिनेमासिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याच्या लव्ह लाइफबद्दल खुलासा केला होता. गोविंदानं या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की नीलमला पाहून तो तिच्या प्रेमात पडला होता. नीलमच्या प्रेमात तो इतका बुडाला होता की त्यानं सुनिताला तिच्यासारखं बनण्याचा सल्ला दिला होता.

Neelam Govinda Sunita

नीलमच्या पाहताच क्षणी प्रेमात पडला होता गोविंदा

रिपोर्ट्सनुसार ‘इल्जाम’ सिनेमाच्या सेटवर नीलम कोठारी हिला गोविंदानं पाहिलं. पाहता क्षणीच तो तिच्या प्रेमात पडला. गोविंदानं सांगितलं की, पहिल्यांदा त्यानं नीलमला प्राणलाल मेहताच्या ऑफिसमध्ये पाहिले होतं. त्यावेळी काळ्याभोर लांबसडक केसांच्या अभिनेत्रीनं पांढऱ्या रंगाची शॉर्ट्स घातली होती. त्यावेळी ती एखाद्या एंजलप्रमाणं सुंदर दिसत होती. नीलमनं गोविंदाला चांगल्याप्रकारे हाय, हॅलो केलं.परंतु गोविंदाला तिला उत्तर देताना घाबरायला झालं होतं. कारण त्याला असं वाटलं की तिच्याशी बोलताना त्याचं इंग्रजी ऐकून ती हसेल.

हे वाचा-हृताचं मन झालं उडू उडू! अभिनेत्रीच्या लग्नाला महिना पूर्ण, रोमँटिक Video शेअर करत म्हणाली..

सुनिताशी कठोरपणं वागला गोविंदा

गोविंदानं या मुलाखतीमध्ये सांगितलं की, ‘मी सुनिताला तिच्यामध्ये बदल करत नीलम सारखं होण्याचा सल्ला दिला होता. मी काय तिला म्हणायचो की तिच्याकडून काही तरी शिक. त्या काळात मी तिच्याशी खूप कठोरपणं वागलो.’ गोविंदानं त्यावेळीही नीलमचं भरभरून कौतुक केलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here