मुंबई : मुंबईमधील कामाठीपुरा हा परिसर तिथे चालणाऱ्या वेश्याव्यवसायमुळे ओळखला जातो. कामाठीपुरा येथे शरीरविक्रय करणाऱ्या महिलांच्या स्थितीबाबत आणि त्यांच्या मुलांच्या भविष्याबाबत अनेकदा चिंता व्यक्ती केली जाते. मात्र या घटकांसाठी भारतीय टपाल विभागाने एक अनोखं पाऊल उचललं आहे. शरीरविक्रय करणाऱ्या महिलांच्या ८ मुलींनी तयार केलेल्या सचित्र पोस्टकार्ड्सचे अनावरण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे शनिवारी करण्यात आलं आहे.

या मुलींनी तयार केलेल्या प्रत्येक सचित्र पोस्टकार्डमध्ये एक ‘क्यूआर कोड’ असणार आहे. हा कोड स्कॅन केल्यावर सदर चित्रामागील त्या मुलीचा नेमका काय विचार आहे, हे समजू शकणार आहे. दरम्यान, हे करत असताना सदर मुलीची ओळख उघड होऊ नये यासाठी या मुलींचं नाव चित्रांना देण्यात आलेलं नाही.

Accident: साताऱ्यात वारकऱ्यांच्या ट्रॉलीला भीषण अपघात, एकाचा मृत्यू, ३० जण जखमी

आशयपूर्ण चित्रे

शरीरविक्रय करणाऱ्या महिलेच्या एका १४ वर्षीय मुलीने मिशा असलेल्या महिलेचं चित्र रेखाटलं आहे. हे चित्र वेश्याव्यवसायातील महिलांची दुहेरी ओळख दर्शवते. या महिलांना आपल्या मुलांसाठी आई आणि वडील या दोघांची भूमिका बजावावी लागत असल्याचं या चित्राच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

दरम्यान, राज्यपालांच्या उपस्थित झालेल्या पोस्टकार्ड्स अनावरण कार्यक्रमाला मुंबई सर्कलच्या पोस्ट मास्टर स्वाती पांडे, प्रोजेक्ट मुंबईचे मुख्याधिकारी शिशिर जोशी, लेखिका व पत्रकार नमिता देवीदयाल, रुपेश सोनवाले तसंच इतर मान्यवरही उपस्थित होते.

मुंबईच्या समुद्राला उधाण; ४.८७ मीटर्स उंच लाटा; नागरिकांना सावधानतेचा इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here