
दयाबेन आणि जेठालाल (तारक मेहता का उल्टा चष्मा)
गेल्या ३ वर्षापासून या मालिकेतील एक मुख्य भूमिका असलेलं दया बेन (Dayaben Coming back to TMKOC?) हे पात्र पडद्यामागेच आहे. ही भूमिका दिशा वकानी (Disha Vakani) करत होती. तिच्या वैयक्तिक कारणामुळे ती या मालिकेत दिसत नसली तरी अनेक सीनमध्ये तिच्या नावाचा उल्लेख केला जातो. सुरूवातीला तिचे आणि जेठालालचे फोनसीन दिसायचे त्यामुळे दया बेन ही मालिकेत दिसत नसली तरी ती आहे असं प्रेक्षकांना वाटायचं. गेल्या काही दिवसांपासून दया बेन मालिकेत परत येणार अशी चर्चा सुरू झाल्याने दिशा वकानीचे चाहते खुश होते. पण आता राखी विजन ही अभिनेत्री दया बेनच्या रूपात येणार असल्याचं बोललं जातंय.
हे वाचा-काजलला अभिनेत्याने न सांगताच केलं होतं किस? त्या घटनेची झालेली जोरदार चर्चा
एकीकडे या मालिकेतून दया बेनच्या कमबॅकची चर्चा सुरू असतानाच या मालिकेचा सूत्रधार तारक मेहता ही भूमिका करणारे शैलेश लोढा (Shailesh Lodha) यांनीही मालिकेला निरोप दिला आहे. ते कवी असल्याने लवकरच ते एका काव्यमैफलीचा शो होस्ट करताना दिसणार आहेत. याच कारणासाठी शैलेश यांनी तारक मेहता या भूमिकेला निरोप दिला. लोढा यांना परत आणण्यासाठी निर्माते प्रयत्न करत आहेत अशीही बातमी आहे. पण अजून तरी तारक फेम शैलेश यांनी दुजोरा दिलेला नाही.

जेठालाल आणि तारक मेहता (TMKOC)
या मालिकेतून आजपर्यंत अनेक कलाकारांची एक्झिट झाली. त्यांच्याजागी नवे कलाकार आले आणि ते प्रेक्षकांनी स्वीकारलेही. पण दया बेन आणि तारक मेहता यांच्या जाण्याची प्रेक्षकांना सर्वाधिक खंत वाटते. यावर जेठालालची भूमिका करणारे दिलीप जोशी (Dilip Joshi) व्यक्त झाले आहेत.
हे वाचा-नीलमच्या प्रेमात होता Govinda, तिला पाहताच बायकोला करायला सांगितली ही गोष्ट
दिलीप जोशी म्हणाले की, दया बेन आणि जेठालाल ही जोडी प्रेक्षकांच्या खास आवडीची आहे. दया बेनची भूमिका दिशाने खूप छान केली. तिला विनोदाचं टायमिंग छान जमतं. आमचे कॉमेडी सीन करताना खूप मजा यायची. तारक हा गोकुळधाममधला माझा बेस्ट फ्रेंड आहे. शैलेश आणि माझ्या सीनची मला आजही आठवण येते. दया आणि तारक यांच्याबाबतीत काय निर्णय घेतला आहे ते निर्मात्यांनी मला सांगितलेलं नाही. कदाचित ते परत येतील किंवा त्यांच्या जागी नवे चेहरे येतील, पण मला दिशा आणि शैलेशची कायमच आठवण येत राहिल.