मुंबई : काँग्रेस नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ‘फादर्स डे’चे औचित्य साधत महत्त्वाची घोषणा केली आहे. त्यांचे वडील, माजी केंद्रीय गृहमंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या सिंचन क्षेत्रातील योगदानावर आधारित माहितीपट ‘जलनायक’चे लवकरच लोकार्पण होणार असल्याचे त्यांनी ट्वीट करून जाहीर केलं आहे.
दरम्यान, अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या या माहितीपटाचे दिग्दर्शन युवा प्रतिभाशाली दिग्दर्शक अजिंक्य म्हाडगुत यांनी केलं आहे. अशोक चव्हाण यांच्या कन्या सुजया व श्रीजया सहनिर्मात्या आहेत.