मिळालेल्या माहितीनुसार, चिमुकलीचे आई-वडील पंधरा वर्षांपासून गावातील शेतकऱ्यांची शेती बटाईने करुन आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात. शनिवारी सकाळी दोघंही शेतात गेले असता चिमुकलीची आजी आणि त्या तीन चिमुकल्या मुलीच घरी होत्या. कच्च्या विटांच्या घरावर लोखंडी पाईपाला साडीद्वारे केलेल्या झोक्यात तीनही मुली खेळत असतानाच अचानक साडीचा झोका तुटला.
या घटनेत दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला व तिच्या दोन्ही बहिणी गंभीर जखमी झाल्या. दोघींवर जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मयत चिमुकलीवर सायंकाळी सावदे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, कोणताही गुन्हा अद्याप नोंदवण्यात आला नाहीये.