वाशी तालुक्यामध्ये एका गावातील एक २४ वर्षीय महिला १७ जून रोजी रात्री आपल्या घरात झोपली असता त्यावेळी त्या सासऱ्याने पिडीत महिलचे तोंड दाबून बळजबरीने तिच्यावर अत्याचार केला असल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, ‘हा झालेला प्रकार कोणाला सांगितल्यास जिवे मारेल, दोन्ही मुलांपासून तुला लांब ठेवून तुझी गावात बदनामी करेल’, अशी धमकी पण दिली. शेवटी या पिडीत महिलेने वाशी पोलीस ठाणे गाठून यापूर्वीही सासऱ्याने अनेकवेळा अशीच बळजबरी करून धमकी देऊन लैंगिक अत्याचार केला असल्याचं सांगितलं.
दरम्यान, याबाबत पतीला सांगून सुद्धा काय फायदा होत नव्हता. पती भोळसर असल्याने वडिलांचीच बाजू घेत होता. अशी तक्रार पिडीत महिलेने शनिवारी दिल्याने पोलिसांनी पती, सासरा, सासू, आजी सासूवर गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपी सासऱ्याला ताब्यात घेतले आणि उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू केला.