अकोला : जिल्ह्यात शहर परिसरासह जिल्ह्याच्या विविध भागात रविवार आज १९ जून रोजी सायंकाळी जोरदार पाऊस बरसला. सुमारे एक मिनीट शहर परिसरात तुरळक ठिकाणी बारीक गारांसह पाऊस झाला. आज सकाळपासूनच प्रचंड उकाडा जाणवायला सुरुवात झाली होती. दुपारी ३ नंतर ढगाळ वातावरण तयार झाले होते. दरम्यान, अमरावतीच्या शिवाजी महाविद्यालय येथील हवामान अभ्यासक प्रा.अनिल बंड यांच्या माहितीनुसार विदर्भात मान्सून बऱ्याच ठिकाणी विदर्भात पोहोचला आहे. त्यातचं आता विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

विजांच्या लखलखाटांसह पडला पाऊस…

सायंकाळी पावणेसहाच्या सुमारात मेघगर्जना आणि विजांच्या लखलखाटात पावसाला सुरुवात झाली. शहरात पावसाचा जोर अधिक होता. त्यामुळे रस्ते आणि सखल भागात पाणी साचले होते. दरम्यान, आठवड्याभरापासून जिल्ह्यात पावसाचे वातावरण असल्याने उन्हाची तिव्रता कमी झाली आहे. परिणामी तापमानात घट होऊन जिल्ह्यातील कमान तापमान ३३ ते ३५ अंश सेल्सिअसपर्यंत राहत आहे. ऊन कमी झाले असले तरी दोन दिवसांपासून उकाडा जाणवत होता.

युवराज सिंगने आपल्या मुलाचं Father’s Dayच्या दिवशी केलं बारसं, सुंदर आहे नावाचा अर्थ…
विदर्भातील पश्चिम विदर्भात विविध भागात खरीपाच्या पेरण्यांना सुरुवात झाली आहे. अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात ज्या भागात जमिनीची ओल आहे अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीला सुरूवात केली आहे. येत्या २५ जूनपर्यंत विदर्भात विविध जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

अमरावतीच्या शिवाजी महाविद्यालय येथील हवामान अभ्यासक प्रा. अनिल बंड यांच्या माहितीनुसार विदर्भात मान्सून बऱ्याच ठिकाणी पोहोचला आहे. येत्या दोन दिवसात तो विदर्भातील उर्वरित भागात पोहचण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. त्यामुळे पुढील काही दिवस विदर्भातील अनेक भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे. पश्चिमी विक्षोभाच्या प्रभावामुळे हवेच्या वरच्या थरात वाहणारे वारे आणि अरबी समुद्रातून हवेच्या खालच्या थरात वाहणारे वारे यांच्या प्रभावामुळे विदर्भात आज १९ तारखेला तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

IND vs SA 5th T20 Live Score : भारत आणि द. आफ्रिकेच्या सामन्याचे लाइव्ह अपडेट्स
‘या’ तारखांनुसार पावसाची शक्यता…

१९ जून रोजी अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ व वर्धा जिल्ह्यात बऱ्याच भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. उर्वरित विदर्भात काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरुपात पाऊस होईल.

२० जून रोजी चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा व यवतमाळ जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. उर्वरित विदर्भात काही ठिकाणी विखुरलेला पाऊस होणार आहे.

२१ जून रोजी विदर्भात काही भागात विखुरलेल्या स्वरूपात हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतोय.

२२ जून रोजी विदर्भातील सर्वच जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तविली आहे.

२३ ते २५ जून दरम्यान, विदर्भात विखुरलेला ते बऱ्याच भागात पावसाची शक्यता आहे.

बिक्कड गोळीबार प्रकरणात नवी माहिती, पवनचक्की टेंडरवर संशयाची सुई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here