मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय नौदलाच्या करोना पॉझिटिव्ह आढळलेल्या २१ जवानांना मुंबईतील INHS या नेव्ही रुग्णालयात आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. यात ‘आयएनएस आंग्रे’ या नौदलाच्या प्रशासकीय तळावर आढळलेल्या २० करोनाबाधित जवानांचाही समावेश आहे. मुख्य म्हणजे, या जवानांमध्ये करोनाची कोणतीही लक्षणं आढळून आली नव्हती.
हे जवान ७ एप्रिल रोजी आढळलेल्या एकाच करोनाबाधिताच्या संपर्कात आले होते. ‘आयएनएस आंग्रे’मध्ये हे सर्व जवान एकाच ठिकाणी राहत होते. यानंतर, बाधित परिसर आणि ‘आयएनएस आंग्रे’ या इमारतीला सील करण्यात आलंय. या भागाचं निर्जंतुकीकरणाचं कामही लवकरच पार पडेल. नौदलाच्या कोणत्याही जहाज किंंवा पानबुडीवर तैनात जवानांमध्ये अद्याप करोनाची लागण झाली नसल्याचं नौदलाकडून स्पष्ट करण्यात आलंय.
वाचा :
वाचा :
लष्करातही
या अगोदर लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांनी लष्करातील आठ जवानांना करोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. यामध्ये दोन डॉक्टर आणि एका नर्सचाही समावेश आहे. तसंच करोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात नसलेल्या जवानांना त्यांचया युनिटमध्ये परत बोलावण्यात आलंय. यासाठी बंगळुरू ते जम्मू आणि बंगळुरू ते गुवाहाटी अशा दोन विशेष रेल्वेही निर्धारीत करण्यात आल्या आहेत.
वाचा :
वाचा :
देशात ११,६१६ जणांवर उपचार सुरू
दरम्यान, देशातील करोनाबाधित रुग्णांचा आकडा १३,८३५ वर पोहचलाय. यातील, १,७६७ रुग्णांवर उपचार यशस्वी ठरलेत तर ११,६१६ रुग्णांवर देशातील वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. तर आत्तापर्यंत ४५२ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
वाचा :
वाचा :
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times