रायगड : कोकण व पश्चिम महाराष्ट्र संपर्क व पर्यटकांसाठी महत्वाचा असलेला महाबळेश्वर पोलादपूर रस्ता आज बंद ठेवण्यात आला आहे. सोमवार दि. २० जून रोजी रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामांसाठी अंबेनळी घाट रस्ता व पार फाटा ते देवळी हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम उपविभाग महाबळेश्वर येथील उपविभागीय अभियंता महेश गोंजारी यांनी दिली.

जुलै २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये तालुक्याच्या पश्चिम भागातील रस्ते, घाट, पुल, शेती, घरे, जनावरे यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. रस्त्यांवर अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या. नदी, नाले, ओढे पात्रातुन मोठया प्रमाणावर दगड, माती, वृक्ष रस्त्यावर येवुन मोरी, पुल यांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले होते. रस्ता वाहुन जाणे, पुल वाहुन जाणे अशा प्रकारे देखील झाले होते. त्यामुळे या सर्व ठिकाणी दुरूस्तीची कामे सुरू आहेत.

विधान परिषदेसाठी आघाडीचे कोट्याचे गणित जुळले; मतदानासाठी आमदारांना महत्त्वाच्या सूचना
या सर्व कामांची आ. मकरंद पाटील यांनी मागील आठवड्यात भेट देवून पाहणी केली होती. या वेळी मकरंद पाटील यांनी ही सर्व कामे पावसाळ्याआधी पूर्ण करा असे आदेश दिले होते. त्याच प्रमाणे या पावसाळ्यात रस्ता बंद राहणार नाही याची खबरदारी घ्या अशा सुचना सार्वजनिक बांधकाम विभागास केल्या होत्या. त्यानुसार आजपासून महाबळेश्वर पोलादपुर या रस्त्यावरील किल्ले प्रतापगड फाटा ते मेटतळे या दरम्यानचा घाटरस्ता व कुंभरोशी येथून पारफाटा ते देवळी रस्ता असे दोन रस्ते दुरूस्तीच्या कामामुळे सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.

मुंबईत पावसाला सुरुवात होताच दरड कोसळण्याची टांगती तलवार; रहिवासी भयभीत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here